Dhayari Crime : अरेरावी करणारी महिला पोलीस कर्मचारी निलंबित

भटक्या कुत्र्यांना अन्न देणाऱ्या महिलेवर हल्ला करणे भोवले.
Crime
Crimesakal

धायरी - डीएसके विश्व येथील चद्रंमा सोसायटीच्या भागात राहणार्‍या भटक्या श्वानांना वेळेवर अन्न मिळत नसल्याने अन्नासाठी भटकंती करताना अपघात होतात आणि निष्पाप जीव जातो. या मुक्या प्राण्यांना आहे त्या ठिकाणी अन्न देण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून मनिषा पवार यांच्याकडून केले जात आहे.

या मानवतावादी कार्यात अडथळा आणत भटक्या श्वानांना अन्न का देते? म्हणत हल्ला करत श्वानांसाठी आणलेले अन्न फेकून देण्याचे काम चंद्रमा सोसायटीत राहणार्‍या महिला पोलीस कर्मचारी मोहिणी पैठणकर/कुलकर्णी यांच्याकडून झाले. माजी मंत्री मनेका गांधी यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली.

मनीषा पवार यांच्या फिर्यादीवरून पदाचा गैरवापर करत प्राणी प्रेमी महिलेवर हल्ला करत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात पैठणकर/कुलकर्णी यांच्याविरोधात पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहरातील अनेक भागांमध्ये जाऊन ज्या ठिकाणी भटक्या श्वानांचा अधिक वावर आहे. त्याठिकाणी रोज सायंकाळी त्यांच्यासाठी खाद्य घेवून जात वाटप करण्याचे काम मनिषा पवार यांच्याकडून केले जाते. अद्यापर्यंत एकाही श्वानने कुठल्याच व्यक्तीस इजा पोहचेल असे कृत्य केले नसतानाही भटक्या श्वानला अन्न का देते म्हणत पवार यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

यामुळे पवार यांनी पशुसंवर्धन तक्रार विभागाकडे तक्रार करत पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि ३२३,५०६,४२७ प्रमाणे पैठणकर - कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोशल मीडियावर या घटनेची बरीच चर्चा झाली. तसेच वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर रोहिदास पवार पोलीस उपयुक्त पुणे शहर मुख्यालय यांनी महिनी पैठणकर/ कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.‌

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com