धायरी, वडगाव येथे बाप्पाचे शांततेत विसर्जन

घरगुती आणि मंडळांचे बाप्पचे विसर्जन हौदातच
ganesh visarjan
ganesh visarjansakal

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव ,धायरी , नऱ्हे भागात मिरवणूकीविना  गणपती विसर्जन .सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्येलायच्या विसर्जन हौदान मध्ये करण्यात आले बाप्पचे विसर्जन. विसर्जन हौदाना मिळाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.मात्र सार्वजनिक मंडळाच्या पुढे ढोल,ताशांचा गजर ,डिजेच्या तालावर नाचणारी तरूणाई, एकामागोमाग रांगेत असलेले गणपती मंडळे,गुलाल,भांडाऱ्याची उधळण, गणपती सजावट, देखावे सिंहगड रस्त्यावर उत्साही वातावरणात घुमणारा आवाज बंद.

सोसायट्या मध्ये मात्र भावपूर्ण वातावरणात लहान मुलांनी,महिलांनी वाजत गाजत निरोप दिला.मागील वर्षापासून या सगळ्या वातावरणावर कोरोनाचे सावट येऊन ठेपले आणि पुणेकरांचा हिरमोड झाला.सलग दुसऱ्या वर्षी ना गोंगाट,ना मिरवणूक यामुळे सिंहगड रस्ता सुन्न-सुन्न झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com