

Satirical Court Frameworks: Analyzing Udhojis Domestic Workspace Preference Slabs
Sakal
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : ओढवलेली.
महालाच्या खलबतखान्यात मसलतीची तयारी खुद्द राजाधिराज उधोजीमहाराज करत आहेत. मशाली कुठल्या खांबावर लावावी, पेटवावी की न पेटवावी, मेजाभोवती किती खुर्च्या ठेवाव्यात, याचा हिशेब लावणे चालू आहे. मसलत बहु मोलाची आहे. दिल्लीश्वर गनिमास एकदाचे पाणी पाजण्याचा मनसुबा त्यांचे मनी शिजत आहे. अब आगे...
उधोजीराजे : (गर्रकन वळून) कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : (अदबीने प्रवेश करत) मुजरा महाराज! याद केलीत?
उधोजीराजे : (कंटाळून) यादबिद काही नाही हो! आज आपली बैठक आहे ना?