esakal | धोत्रे चौक ते शासकीय तंत्रनिकेतन मैदान रस्त्यावर पी-१,पी -२ पार्किंगची मागणी | pune
sakal

बोलून बातमी शोधा

धोत्रे चौक ते शासकीय तंत्रनिकेतन मैदान रस्त्यावर

धोत्रे चौक ते शासकीय तंत्रनिकेतन मैदान रस्त्यावर पी-१,पी -२ पार्किंगची मागणी

sakal_logo
By
समाधान काटे

शिवाजीनगर : मॉडेल कॉलनीतील धोत्रे चौक ते चतुर्श्रुंगी रस्ता, शासकीय तंत्रनिकेतन मैदानापर्यत पी -१ ,पी-२ पार्किंग करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. सदरील रस्त्यावर दोन्ही बाजूला शिक्षण संस्था, हॉटेल, बॅंक तसेच विविध प्रकारची कार्यालये असल्याने दोन्ही बाजूला रस्त्यावर वाहने उभी केली जातात. यामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. नो पार्किंगचे बोर्ड लावले होते ते सध्या दिसत नाहीत. कॉग्रेसचे चिटणीस संजय मोरे यांनी य संदर्भात चतुर्श्रुंगी वाहतूक पोलिसांना निवेदन दिले आहे.

"वाहतूकीला शिस्त नसल्याने खूप वाहतूक कोंडी होते.दोन्ही बाजूला वाहने लावली जातात.सोसायटीमधून गाडी बाहेर काढायचं म्हटलं तरी त्रास होतो.वाहतूकीचे नियम पाळले जात नाहीत.या रस्त्यावर महाविद्यालय आहेत. आता ती सुरू होणार असल्याने अजून वाहतूक कोंडीत भर पडू शकते.त्यामुळे पी -१,पी-२ पार्किंग करावे"

- रॉजर जोसफ, स्थानिक रहिवासी, आनंद आश्रम सोसायटी, मॉडेल कॉलनी शिवाजीनगर.

हेही वाचा: Aundh : औंधरस्ता येथे महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

"दीप बंगला चौक ते धोत्रे चौकापर्यंत पी -१,पी-२ पार्किंग आहे.मात्र धोत्रे चौक ते शासकीय तंत्रनिकेतन मैदान या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना देखील, पी-१,पी-२ पार्किंग केले नाही.रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जातात. त्यामुळे मधून एकच वाहन जाते.मॉडेल कॉलनीतील आम्ही नागरिकांनी या संदर्भात चतुर्श्रुंगी वाहतूक पोलिसांना निवेदन दिले आहे"

- सुभाष जोशी, स्थानिक रहिवासी, स्वागत क्लासिक सोसायटी मॉडेल कॉलनी शिवाजीनगर.

"नागरिकांची मागणी असेल तर नक्कीच या मागणीची अंमलबजावणी केली जाईल.वाहतूक विभागातील वरिष्ठांचा आदेश आला तर हा प्रश्न मार्गी लावला जाईल"

- प्रकाश मासळकर, चतुर्श्रुंगी वाहतूक पोलिस निरीक्षक.

loading image
go to top