धुळे हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हुकूम मुलाणी
सोमवार, 9 जुलै 2018

मंगळवेढा : ''धुळे हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून चांगला वकील देवून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेत जे आरोपी निश्चित होतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.'' , असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भारत भालके उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना व्यक्त केले.

विधीमंडळाच्या नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात नाथपंथीय डवरी गोसावी समाजातील 5 व्यक्तींना भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या निष्पाप गरिबांंना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाड़ा या गावातील आठवडा बाजारात निर्घृण पणे, अमानुष  मारहाण करून जिवंत ठार मारण्यात आले याबाबत आज प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले की या घटनेचे व्हिडीओ फुटेज उपलब्ध असून प्रत्येकाला अटक चाललेली जो कोणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष या घटनेत सहभागी आहे त्यालाही अटक करण्यात येत आहे. 

मुख्य सुत्रधाराला अटक केली आहे. यामध्ये आमदार भालके यांनी पिड़ीत कुटंबातील लोकांना तातडीने आर्थिक मदत, शासकीय नोकरी, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून, सरकारी वकील म्हणून उज्वल निकम सारख्या हुशार वकिलाची नियुक्ती करुन न्याय द्यावा. या समाजाच्या इतरही मागण्या तातडीने मार्गी लावून झालेल्या प्रकरणातील पिड़ित कुटुंबाचे पुनर्वसन सरकारने तातडीने करावे या बाबत विधान सभेत प्रश्न उपस्थित केला होता.

Web Title: Dhule murder case will run in Fast track court said Chief Minister Devendra Fadnavis