Pune Police : पुणे पोलिसांची डायल ११२ सुविधा ठरतेय प्रभावी

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत एकाच टोल फ्री क्रमांकावर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डायल ११२ ही आपत्कालीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
112 police helpline
112 police helplinesakal
Summary

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत एकाच टोल फ्री क्रमांकावर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डायल ११२ ही आपत्कालीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

पुणे - नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत एकाच टोल फ्री क्रमांकावर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डायल ११२ ही आपत्कालीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्यात विविध प्रकारच्या हेल्पलाइन (१०० पोलिस, १०१ फायर, १०८ वैद्यकीय, १०९१ महिला, १०९० ज्येष्ठ नागरिक, १०९८ या सुविधा कार्यरत आहेत. अशा विविध हेल्पलाइन सेवांचे एकत्रित नियोजन केले जाऊ शकत नाही. अनेक हेल्पलाइन्समुळे नागरिकांमध्येही संभ्रमाची अवस्था असते. पोलिस नियंत्रण कक्षात येणाऱ्या १०० क्रमांकावरील कॉल्सचे व्यक्तीचे ठिकाण आणि नजीकचे पोलिस वाहन यांची माहिती पोलिस नियंत्रण कक्षात लगेच उपलब्ध नसते.

परिणामी अशा हेल्पलाईनला प्रतिसाद देण्यामध्ये विलंब होतो. परिणामी ‘कॉल रिस्पॉन्स टाइम वाढतो. त्यामुळे राज्यस्तरावर एकच हेल्पलाईनमुळे कमी वेळात प्रतिसाद मिळाल्याने प्रसंगी जीवित व वित्त हानी कमी होण्यास मदत होणार आहे. या अनुषंगाने डायल ११२ या हेल्पलाईनची निर्मिती केली आहे. त्यामुळे १०० क्रमांकापेक्षा डायल ११२ ही हेल्पलाइन प्रभावी ठरणार आहे.

रिस्पॉन्स टाइम आठ मिनिटांवर

पुणे पोलिस आयुक्तालयात ५० चारचाकी आणि १०७ दुचाकी अशा एकूण १५७ वाहनांवर मोबाईल डाटा टर्मिनल बसविण्यात आले आहेत. डायल ११२ क्रमांकावर दररोज सरासरी ५५० ते ६०० कॉल येतात. एका महिन्यात सरासरी १५ हजार कॉल प्राप्त होतात, ही संख्या राज्यात इतर जिल्यांपेक्षा सर्वाधिक आहे. पोलिस आयुक्तालयाचा रिस्पॉन्स टाइम हा सरासरी ५५ मिनिटे होता. तो आता सरासरी आठ ते साडेआठ मिनिटांवर आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com