डायरीचा आता बदलतोय ‘लूक’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे - संगणक आणि मोबाईलच्या वाढत्या वापराच्या जमान्यात डायरी खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यावर मात करण्यासाठी उत्पादकांकडून नवे फंडे राबविण्यात येत आहेत. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जुळणारे विषय मांडून, डायरीचा लुक बराच बदलल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर सरकारी योजनांचा उल्लेख करत, सामाजिक संदेश देणाऱ्या डायऱ्यांचीही बाजारात रेलचेल आहे.  

डिजिटल डायरीच्या ट्रेंडमुळे पारंपरिक डायरीचा वापर कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘सेव्ह अर्थ’, ‘मेक इन इंडिया’ असा संदेश देणाऱ्या डायऱ्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ‘इंजिनिअरिंग डायरी’चा खप गेल्या वर्षीपासून वाढला आहे. ज्यात अभियांत्रिकीतील सिव्हिल, इलेक्‍ट्रॉनिक, मेकॅनिकल अशा सर्व विषयांसंबंधीची माहिती दिलेली आहे. विश्वास, कला, शांती, प्रेरणा, आत्मविश्वास, यश-अपयश यांबद्दल संदेश देणाऱ्या डायऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे भेटवस्तू देण्याच्या दृष्टीने या डायऱ्यांना लोकांची पसंती मिळत आहे. याशिवाय पर्यावरणावर आधारित डायरीचा अधिक बोलबाला आहे. ‘कागद वाचवा’, ‘प्लॅस्टिकचा पुनर्वापर करा’, ‘गॅसचा वापर कमीत कमी करा’, ‘सोलर सिस्टिमचा वापर पर्यावरणपूरक आहे’ आदी संदेशपर माहिती यात दिली आहे.

सध्या मोबाईलच्या अतिवापराने डायरी खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल एक ते दीड कोटीची आहे. आता बाजारात येणाऱ्या डायरींच्या पानांसाठी नैसर्गिक गोष्टींपासून बनलेल्या कागदाचा जास्त वापर होतो. ही पाने आता पुन्हा वापरता येतील, अशी सोय झाली आहे. 
- सचिन गायकवाड, डायरी विक्रेते

Web Title: Diary Look Change