बाप रे ! महिन्याभरात डिझेल 'एवढे' महागले; कार चालकांचे बजेटही कोलमडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

 एक जूनपासून लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या काही सवलतीनंतर पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढली होती. त्यामुळे तेव्हापासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (व्हॅट) एक जून रोजी राज्य सरकारने अधिभार वाढवला आहे. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर चढे असतील हे स्पष्ट झाले होते.

पुणे : दुचाकीसह नियमित चारचाकी वाहनाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला बसणारी चाट गेल्या महिन्याभरात 18.35 रुपयांनी वाढली आहे. कारण एक जूनपासून डिझेलच्या किमतीत 10.36 रुपयांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल 7.99 रुपयांनी महागले आहे. सीएनजीचे दर मात्र 53.80 रुपयांवर स्थिर आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 एक जूनपासून लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या काही सवलतीनंतर पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढली होती. त्यामुळे तेव्हापासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (व्हॅट) एक जून रोजी राज्य सरकारने अधिभार वाढवला आहे. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर चढे असतील हे स्पष्ट झाले होते. इंधन अधिभार वाढविल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर सुसाट सुटलेल्या इंधन दरवाढीच्या गाडीचा वेग गेल्या आठवड्यात काहीसा मंदावला आहे. काल आणि आज (ता. 29 व 30) पेट्रोल किंवा डिझेलची किंमत वाढलेली नाही. त्यामुळे किमान या आठवड्यात तरी इंधनाचे दर स्थिर राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनपूर्वी सर्व सुरळीत असताना शहरात रोज 30 लाख लिटर पेट्रोल आणि 40 लाख लिटर डिझेलची विक्री होत होती. मात्र लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना इंधन देण्याची परवानगी होती. त्यामुळे विक्री अगदी पाच ते दहा टक्क्यांवर येऊन पोहोचली होती. सध्या मात्र विक्रीची टक्केवारी वाढली आहे. पूर्वीच्या तुलनेत 70% पेट्रोल- डिझेलची दररोज विक्री होत आहे. 
 

महिन्याभरातील दरवाढ : 
पेट्रोल 7.99  रुपये
डिझेल 10.36 रुपये

1 जून रोजीचे दर 
पेट्रोल 78.09 रुपये 
डिझेल 66.99 रुपये 

30 जूनचे दर
पेट्रोल 86.89 रुपये 
डिझेल 77.35 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diesel went up by Rs 10 in a month