महिलांचे वजन अन् निरोगी आयुष्यासाठी 'डायटक्वीन' स्टार्टअप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fat Women

महिलांच्या बाबतीतही या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात. मात्र, त्याची पूर्तता करणे त्यांनाही मुश्कील होऊन बसते.

महिलांचे वजन अन् निरोगी आयुष्यासाठी 'डायटक्वीन' स्टार्टअप

पुणे - तब्येत कमी (Body Loss) किंवा जास्त करायची असेल, तर घरगुती उपायांपासून डॉक्टरचा (Doctor) सल्ला घेण्यापर्यंतचे अनेक इलाज केले जातात. मात्र, प्रत्येकजण त्यात सातत्य ठेवत नाही. त्यामुळे डाएट प्लॅन (Diet Plan) काही महिनेच सुरू ठेवल्याचे अनेक उदाहरणे आपण पाहतो.

महिलांच्या बाबतीतही या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात. मात्र, त्याची पूर्तता करणे त्यांनाही मुश्कील होऊन बसते. त्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष होते. महिलांना संतुलीत आहार मिळावा व त्यांचे आरोग्य सुधारावे, यासाठी काम करीत असलेले डॉ. किरण रुकडीकर यांचे डाएटक्वीन (dietqueen) हे ॲप्लिकेशन महत्त्वाचे ठरत आहे. लठ्ठपणा व्यवस्थापन आणि २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले वजन कमी करणारे विशेषज्ञ, अशी डॉ. रुकडीकर यांची ओळख आहे. महिलांचे वजन कमी करण्यासाठी, त्यांना निरोगी आयुष्य देण्यासाठी आणि दीर्घकाल महिलांचे वजन कमी राहावे, यासाठी प्रयत्न करते. त्यासाठी घरगुती आहार आणि चालण्यावर भर देण्यात येतो. ३०-४५ वयोगटातील महिलांना या माध्यमातून लक्ष्य करण्यात येत आहे.

या स्टार्टअपबद्दल डॉ. रुकडीकर म्हणाले, ‘डाएट प्लॅन ही प्रत्येकाच्या आवाक्यातील बाब नसते. तसेच, त्याबाबत सातत्याने मार्गदर्शन मिळेलच असे नाही. प्लॅनमध्ये सांगितलेले खाद्यपदार्थ प्रत्येकाला परवडणारे नसतात. त्यामुळे आम्ही घरगुती आहार आणि चालण्यावर भर असलेली सिस्टिम विकसित केली आहे. त्याद्वारे महिलांना त्यांचे वजन कमी करण्यास मदत होते. महिलेची माहिती घेऊन त्यांना त्याचप्रकारे प्लॅन दिला जातो. प्लॅनचा त्यांच्यावर काय परिणाम झाला, याचा दर १५ दिवसांनी आढावा घेतला जातो. त्यानुसार त्यांच्या प्लॅनमध्ये बदल करण्यात येतात. कोणता पदार्थ किती खायचा, याची सविस्तर माहिती ॲपमध्ये दिली जाते.’

प्रत्येक महिलेचे वजन हे वेगवेगळे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी असणारा डाएट प्लॅनदेखील वेगळा हवा. त्यावर आम्ही प्रामुख्याने काम करतो. वजन कमी करण्यासाठी स्त्रियांना समतोल आहार हवा असतो. त्यांची ही गरज कमीत-कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही हे ॲप सुरू केले. घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरून वजन कमी करण्यावर आमचा भर आहे. सर्व वयोगटांतील महिलांसाठी असलेले हे ॲप ३०-४५ वयोगटांतील महिलांना लक्ष्य करते.

- डॉ. किरण रुकडीकर, संस्थापक, डाएटक्वीन

ॲपची वैशिष्ट्ये...

  • घरगुती आहार व चालण्यावर भर देते

  • अॅप आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध

  • देशातील त्या-त्या भागानुसार खाद्यपदार्थ सांगितले जातात

  • ३०-४५ वयोगटातील महिलांना लक्ष्य

  • जेवण कसे बनवायचे याचीही माहिती दिली जाते

Web Title: Dietqueen Startup For Womens Weight And Healthy Living

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top