गॅससाठी डिजिटल पेमेंटच हवे! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर (एलपीजी) घरी पोचविल्यानंतर रोख स्वरूपात पैसे स्वीकारण्यापेक्षा ग्राहकांनी डिजिटल पेमेंट करावे, यासाठी काही गॅसवितरक कंपन्या वितरकांना उद्दिष्ट ठरवून देत आहेत. त्यामुळे रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमातून व्यवहार करावा, यासाठी वितरक आग्रह धरत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. 

पुणे - स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर (एलपीजी) घरी पोचविल्यानंतर रोख स्वरूपात पैसे स्वीकारण्यापेक्षा ग्राहकांनी डिजिटल पेमेंट करावे, यासाठी काही गॅसवितरक कंपन्या वितरकांना उद्दिष्ट ठरवून देत आहेत. त्यामुळे रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमातून व्यवहार करावा, यासाठी वितरक आग्रह धरत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात प्रामुख्याने हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी), भारत गॅस आणि इंडेन या तीन कंपन्यांमार्फत घरगुती आणि व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर पुरविण्यात येतात. त्यातील "एचपी'ने आपल्या वितरकांना ग्राहकांकडून डिजिटल पेमेंट घेण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉय सिलिंडर घेऊन आल्यानंतर ग्राहकांना ऑनलाइन पैसे देण्याची मागणी करीत आहे. त्यासाठी "एचपी'ने एक ऍप्लिकेशनही तयार केले आहे. तसेच, ग्राहकांना स्मार्ट कार्डही देण्यात येत आहे. मात्र, सर्वच ग्राहकांकडे ऑनलाइन पैसे देण्याचे माध्यम नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. 

हेही वाचा  : मृत्यू झालेल्या कर्जदाराचे कर्ज माफ

भारत गॅस किंवा इंडेन या कंपन्यांचाही डिजिटल व्यवहारांवर भर आहे. मात्र, वितरकांना त्याबाबत उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले नाही, असे या कंपन्यांच्या वितरकांनी स्पष्ट केले. आमचे सुमारे 15 टक्के ग्राहक डिजिटल पेमेंट करतात, असेही त्यांनी सांगितले. 

"डिजिटल व्यवहारांची सक्ती नाही' 
याबाबत "एचपी'च्या वाघोली येथील मयूरेश्‍वर गॅस एजन्सीचे रणजित जाधवराव म्हणाले की, एकूण व्यवहारांपैकी 25 टक्के व्यवहार डिजिटल स्वरूपात करावेत, असे उद्दिष्ट आहे. सध्या सुमारे 10 टक्के नागरिक डिजिटल पेमेंट करतात. ऑनलाइन पैसे देण्यासाठी कंपनीने "इझी सुविधा' हे ऍप्लिकेशन उपलब्ध केले आहे. तसेच, "इझी कॅश कार्ड'ही देण्यात आले आहे. ऑनलाइन पेमेंटची सक्ती करण्यात आलेली नाही. डिलिव्हरी बॉय रोख रक्कमही स्वीकारत आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digital payment is required for gas