डिजिटल कार्यशाळेला महिलांचा प्रतिसाद

रमेश मोरे 
रविवार, 3 जून 2018

नगरसेविका सौ.माई ढोरे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे यांनी कार्यशाळेला भेट दिली. याचबरोबर येथील भाजपा युवा मोर्चा व माता महिला बचतगट यांच्या वतीने नागरीकांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर सर्व प्रकारच्या वह्या विक्रि स्टॉलची शितोळेनगर येथे सुरूवात करण्यात आली.

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका शारदा सोनवणे यांनी आयोजन केलेल्या डिजिटल महिला कार्यशाळेला महिलांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

५० महिलांची पहिली बँच येथील डॉल्फिन शाळेत सुरू आहे. पेटीएमचा वापर कसा करावा.फेसबुक मेल खाती व त्याबाबतची जागरूकता कशी राखावी. याबाबत तज्ञ मार्गदर्शकांकडुन या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. विविध सरकारी योजनांचे अर्ज ऑनलाईन कसे भरावे.आदी माहिती या कार्यशाळेतुन देण्यात आली.  याचबरोबर महिलांसाठी ईंग्रजी बोलणे कोर्स घेण्यात आला पन्नास महिला या कार्यशाळेचा मोफत लाभ घेत अाहेत. महिलांचा वाढता प्रतिसाद पाहुन लवकरच दुसरी बँच सुरू करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगीतले. या कार्यशाळेत प्रा..सौ.पद्मा लोहिया महिलांना मार्गदर्शन करत आहेत.

नगरसेविका सौ.माई ढोरे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे यांनी कार्यशाळेला भेट दिली. याचबरोबर येथील भाजपा युवा मोर्चा व माता महिला बचतगट यांच्या वतीने नागरीकांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर सर्व प्रकारच्या वह्या विक्रि स्टॉलची शितोळेनगर येथे सुरूवात करण्यात आली.

Web Title: digital workshop for women

टॅग्स