दिलीप बराटे लागले कामाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

सत्ताधारी भाजपला खडकवासल्यात नाकीनऊ आणत निसटता पराभव स्वीकारलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता "हिशोबी' राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदावर बसवूनही दिलीप बराटेंनी खडवासल्यातील राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंना साथ दिली नसल्याच्या चर्चेनंतर बराटेंवर पक्षातर्गंत गंडांतर ओढविण्याची शक्‍यता वर्तवित येत आहे.

पुणे : सत्ताधारी भाजपला खडकवासल्यात नाकीनऊ आणत निसटता पराभव स्वीकारलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता "हिशोबी' राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदावर बसवूनही दिलीप बराटेंनी खडवासल्यातील राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंना साथ दिली नसल्याच्या चर्चेनंतर बराटेंवर पक्षातर्गंत गंडांतर ओढविण्याची शक्‍यता वर्तवित येत आहे.

दुसरीकडे, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर अपयशाचे खापर फोडत बरोटेही आक्रमक पवित्र्यात पुढे येत आहेत. भाजपविरोधात "घंटानाद' आंदोलन करण्याचा इशारा देत, पक्षात सारे काही आलबेल आहे, याकडे बराटे यांनी लक्ष वेधल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार भीमराव यांना पहिल्यांदाच कडवी झुंज देत राष्ट्रवादीच्या दोडके यांनी 1 लाख 17 हजार मते घेतली. या निवडणुकीत तापकीर यांना 2 हजार 100 मतांनी आपली हॅट्रीक राखता आली. परंतु, निकालानंतर राजकीय क्षेत्रात चर्चा झाली तरी, राष्ट्रवादीच्या मुसंडीच. दरम्यान, निवडणुकीआधी भाजपमध्ये "इन्किमिंग' सुरू असतानाच महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि त्यांचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यातून बराटे आणि त्यांच्या समर्थकांनी दोडकेंसाठी फार काही केले नाही, असा सूर राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त करण्यात आला. तेव्हाच नेत्यांनी एकदिलाने काम केले असते तर, भाजपला रोखता येऊ शकले असते? असा आशावाद राष्ट्रवादीला होता. त्यामुळे दोन हजार मतांनी झालेला पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला असून, त्यामुळे खहवासल्यातील नेत्यांचा राजकीय हिशोब घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठी महापालिकेतील महत्त्वाच्या या पदावर बराटेंना संधी दिली होती. त्याचवेळी या पदावरील व्यक्ती दरवर्षी बदलण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तेव्हा जाहीर केले होते. त्यामुळेही बराटे यांच्याकडील जबाबदारी काढून घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.त्याआधी सत्ताधाऱ्यांविरोधात बराटे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

बराटे म्हणाले, "शहरात खड्डे पडले आहे. धरणात पाणी असूनही पुणेकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. पूरस्थितीमुळे लोकांचे नुकसान झाले असून, त्यांनाही पुरेशी मदत मिळत नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी लवकरच घंटानाद करणार आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip barate gate back to work in pune city