Pune : बाजार समिती पुणेच्या सभापतीपदी दिलीप काळभोर तर उपसभापतीपदी रविंद कंद बिनविरोध

सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी हवेली बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक
Dilip Kalbhor as Chairman of Market Committee Pune and Ravind Kand unopposed Deputy Chairman pune
Dilip Kalbhor as Chairman of Market Committee Pune and Ravind Kand unopposed Deputy Chairman punesakal

पुणे : पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची समजली जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या सभापतिपदी दिलीप काशिनाथ काळभोर यांची तर उपसभापतिपदी पदी लोणी कंद येथील रविंद नारायण कंद यांची बिनविरोध निवड झाली. दिलीप काळभोर यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड झाली आहे. तर रविंद्र कंद हे पहिल्यांदांचा निवडुन आले आहेत.

सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी हवेली बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण ) तथा निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीसाठी सभापतीपदासाठी दिलीप काळभोर तर उपसभापदासाठी रविंद्र कंद यां दोघांचे उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी वरील दोघांच्या निवडीची घोषणा केली.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांच्यासाठी नुकतीच निवडणुक झाली होती. या झालेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद आणि पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 13 जागा जिंकल्या होत्या.

तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या "अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल" ला अवघ्या 2 जागांच्यावर समाधान माणावे लागले होते. तर व्यापारी व हमाल-मापाडी गटातुन तीन उमेदवार स्वतंत्र निवडून आले यांमध्ये व्यापारी अडते गटातून गणेश घुले, अनिरुद्ध (बापू) भोसले तर हमाल मापाडी मधून संतोष नांगरे निवडून आले आहेत.

दरम्यान सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडी जाहीर होताच, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद आणि पीडीसीसीचे संचालक विकास दांगट, बाजार समितीचे वरीष्ठ संचालक रोहिदास उंद्रे,

प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलीप काळभोर व रविंद्र कंद यांचे पुष्पहार घालुन अभिनंदन केले. यावेळी मार्केटयार्ड आवारात गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. बाजार परिसरातून मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला.

बाजार समिती गुलालमय

सभापती आणि उपसभापती निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून आणि फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी बाजार समितीच्या कार्यालयात सर्वत्र गुलाल पसरलेला पाहवयास मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com