Dilip Walse Patil : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या डाव्या पायावर व हातावर शनिवारी ता 30 पुणे परिसरातील जुपिटर हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही फोन आला होता.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sakal

मंचर : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या डाव्या पायावर व हातावर शनिवारी ता 30 पुणे परिसरातील जुपिटर हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही फोन आला होता.

वळसे पाटील यांना भेटण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे हॉस्पिटल ला आल्या होत्या. तब्बल अर्धा तास त्या तिथे थांबल्या होत्या. त्यांनी कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांना धीर दिला . तब्येतीची काळजी घेण्याविषयी सूचित केले.

पुणे येथील निवासस्थानी बुधवारी रात्रीदिलीप वळसे पाटील पाय घसरून जमिनीवर पडले होते. त्यांच्या डाव्या खुब्याला व हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने औंधपरिसरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. वैद्यकीय तपासणी नुसार त्यांच्या डाव्या पायाच्या खुब्याला व डाव्या हाताला फॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले होते.

ही माहिती समजल्यानंतर तातडीनेराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपर्क करून एअर ॲम्बुलन्स द्वारे वळसे पाटील यांना मुंबईला हलविण्याची तयारी केली होती. पण मुंबई प्रमाणे जुपिटर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत . येथे यशस्वी शस्त्रक्रिया होईल.असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार वळसे पाटील यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

शरद पवार यांनी मोबाईल द्वारे संपर्क करून चर्चा केली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे जुपिटर हॉस्पिटलमध्ये तब्बल अर्धा तास थांबल्या होत्या. त्यावेळी वळसे पाटील अतिदक्षता विभागात होते .शस्त्रक्रिया सुरू होती.

दरम्यानच्या काळात शास्त्रीयपूर्ण झाल्यानंतर ऑपरेशन थेटर मधून वळसे पाटील यांना त्यांच्या आरक्षित केलेल्या आती दक्षता विभागात नेत असताना सुप्रिया सुळे तेथेच होत्या त्यानंतर त्या तेथून निघून गेल्या. दरम्यानच्या काळात त्यांनी पूर्वा वळसेपाटील यांच्या समावेत चर्चा केली. अजित पवार यांनीही संपर्क केला होता. डॉक्टर बरोबर त्यांनी चर्चाही केली.

वळसे पाटील यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही. सध्या त्यांना कोणालाही भेटता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे . त्यांना विश्रांतीची गरज असल्याने सध्या कोणी भेटायला येऊ नये अशी विनंती शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com