Valase Patil Accident: दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत; घरात पाय घसरुन पडल्याने हात फ्रॅक्चर; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुण्यातील घरात (बुधवार ता.२७) रोजी रात्री पाय घसरुन पडल्याने त्यांचा हाताला व पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघाताबाबत स्वतः वळसे पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
Dilip Valse Patil seriously injured Hand fracture due to foot slip at home hospitalize
Dilip Valse Patil seriously injured Hand fracture due to foot slip at home hospitalize Sakal

निरगुडसर : महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुण्यातील घरात (बुधवार ता.२७) रोजी रात्री पाय घसरुन पडल्याने त्यांचा हाताला व पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघाताबाबत स्वतः वळसे पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे सरकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून हे आपल्या पुण्यातील घरात बुधवारी रात्री पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या हात व पायाला दुखापत झाली आहे,त्यांच्या खुब्याला मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे,डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील होण्याचे संकेत डॉक्टरांनी व्यक्त केले आहेत.

वळसे पाटील यांचे ट्विट:काल रात्री पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत,काही काळ डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत सामाजिक कामात सक्रिय होईल असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वळसे पाटील यांना अपघात झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) टेन्शन वाढले आहे.शिरूर लोकसभा मतदार संघाच्या प्रचाराची मोठी जबाबदारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वर आहे,आणि त्यांनी नुकतेच माजी खासदार शिवाजराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन तिकीट मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे,

त्यामुळे आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी वळसे पाटील यांना पायाला भिंगरी लाऊन फिरावे लागणार आहे परंतु वळसे पाटील यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अपघात झाल्याने सर्वांचे टेन्शन वाढले आहे.

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पायाला व हाताला दुखापत झाल्यामुळे त्यांना बुधवारी रात्री पुणेपरिसरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

त्यांना विश्रांतीची गरज असल्यामुळे डॉक्टरांनी केलेल्या सूचनेनुसार त्यांना कोणीही सध्या भेटण्यासाठी येऊ नये. अशी विनंती आहे "असेआवाहन दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी केले आहे

त्या म्हणाल्या"पुण्यातील निवासस्थानी वळसे पाटील खाली पडल्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला व डाव्या पायाला दुखापत झाली आहे. शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना विश्रांतीची नितांत गरज आहे. काळजी करण्यासारखे नाही.योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत. ते लवकरच बरे होऊन सामाजिक कामात सक्रिय होतील. असे पूर्वा वळसे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान बुधवारी दिवसभर वळसे पाटील हे मुंबईमध्ये मंत्रालय व निवासस्थानी कामकाजात व्यस्त होते. रात्री ते मुंबईहून पुणे येथे निवासस्थानी आले. नियोजित कार्यक्रमानुसार ते गुरुवारी शिरूर लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणनीतीचे नियोजन करणार होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराची जबाबदारी वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीने सोपवलेली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व अन्य मित्र पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन व चर्चासत्र ही वळसे पाटील सुरू करणार होते.

हॉस्पिटलमध्ये त्यांच्या समवेत असलेले शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले,

'वळसे पाटील यांची तब्येत व्यवस्थित आहे. काळजी करण्यासारखे काहीच कारण नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना घरी सोडणार आहेत. त्यानंतर त्यांचे सामाजिक क्षेत्रातील व शिरूर लोकसभा मतदारसंघातील कामकाज गतीने सुरू होईल. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याविषयी सूचित केले आहे. त्यांना विश्रांतीची नितांत गरज आहे.त्यामुळे कुणालाही भेटण्यास डॉक्टर परवानगी देत नाहीत. या कामी जनतेने सहकार्य करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com