कोरोनाला रोखण्यासाठी वळसे पाटील यांच्या सूचना

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 29 मे 2020

मंचर (ता. आंबेगाव) येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

मंचर (पुणे) : "आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे सेंट्रलाइज गॅस पाईपलाईन सिस्टीम यंत्रणा उभी करा. खासगी हॉस्पिटलमध्ये कोव्हीडसाठी १०० बेडची व्यवस्था करावी," अशा सूचना कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.

शिरूर शहरावर कोरोनाच्या धोक्याची टांगती तलवार

मंचर (ता. आंबेगाव) येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या वेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आंबेगाव जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी, खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, मंचरचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार आदींनी चर्चेत भाग घेतला.

बारामतीत हाॅटेलला परवानगी न मिळाल्यास

वळसे पाटील म्हणाले की, तीन लॉकडाउन होईपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. पण, शहरातून आलेल्या काही व्यक्तीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाच बेड अतिदक्षता विभागात व वीस बेडचे विलगीकरण कक्ष आहे. रुग्णवाहिकांचा तुटवडा भासू नये म्हणून खासगी तीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना साहित्य व सुविधा पुरवल्या जातील. गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

मुंबईहून जुन्नरमध्ये येताय तर...

भीमाशंकर कारखान्याने या पूर्वी माळीण दुर्घटना, कोल्हापूर-सांगली पूरग्रस्त यांच्या मदतीसाठी मदत केली. त्याप्रमाणेच कारखान्यामार्फत सॅनिटायझर, मास्क, पीपीई कीट, सोडियम हायकोक्लोराइड, हॅन्डग्लोज आदी साहित्य आरोग्य क्षेत्रात काम करण्याऱ्यासाठी उपलब्ध करून दिले आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Walse Patil's instructions to stop Corona