लॅटिन ग्रॅमी सोहळ्यात दोसांझ यांचे सादरीकरण

लॅटिन ग्रॅमी सोहळ्यात 
दोसांझ यांचे सादरीकरण
Published on: 

लॅटिन ग्रॅमी सोहळ्यात
दोसांझ यांचे सादरीकरण
नवी दिल्ली, ता. १३ (पीटीआय) : पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझ यांनी लॅटिन ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात थेट सादरीकरण करणारे पहिले भारतीय कलाकार होण्याचा मान मिळवला. लास वेगास येथे झालेल्या २७ व्या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी प्युर्तो रिकन गायक डॅडी यांकी यांच्यासोबत व्यासपीठावर गाणे सादर केले.
एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे गुरुवारी झालेल्या या सोहळ्यात दोन्ही कलाकारांनी नुकतेच प्रदर्शित झालेले ‘पोकीटो’ हे संयुक्त गाणे सादर केले. या गाण्यात पंजाबी आणि लॅटिन संगीताचा संगम पाहायला मिळाला. दिलजीत यांनी या सादरीकरणाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर शेअर केला. या पुरस्कार सोहळ्यात बेबी रँक्स, बॅड ग्याल, दिविनो, डीजे प्रीमियर, ग्रुपो निचे, जे व्हीलर, लिल सुपा, लुई एन्रिक, नॅथी पेलुसो आणि एंजेल ‘कुक्को’ पेना यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांनीही सादरीकरण केले. दरम्यान, दिलजीत यांनी पडद्यामागे डॅडी यांकी यांच्या आई रोझा रॉड्रिग्ज यांची भेट घेतल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेत आहे. या भेटीत दिलजीत यांनी त्यांची ओळख करून दिल्यानंतर वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करत आदर व्यक्त केला. यावेळी डॅडी यांकी दिलजीत यांचे स्वागत करताना दिसले. दिलजीत यांच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेत या कामगिरीमुळे आणखी भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.