आंबेगाव, जुन्नर व शिरूरकरांसाठी दिलासादायक बातमी : डिंभे धरण 99 टक्के भरले

चंद्रकांत घोडेकर
Sunday, 13 September 2020

आंबेगावसह जुन्नर व शिरूर तालुक्‍याला वरदान ठरलेले डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) आज (ता. 13) सकाळी 99.02 टक्के भरले आहे. या पाण्यावर अवलंबून असणारे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका यांनाही या पाण्याचा उपयोग होणार आहे.

घोडेगाव (पुणे) ः आंबेगावसह जुन्नर व शिरूर तालुक्‍याला वरदान ठरलेले डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) आज (ता. 13) सकाळी 99.02 टक्के भरले आहे. या पाण्यावर अवलंबून असणारे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका यांनाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. यावर्षी कुकडी प्रकल्पाचा साठा 72.53 टक्के असून, तो वाढण्याची अपेक्षा कमी आहे. त्यामुळे यावर्षी डिंभेच्या पाण्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्‍यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

डिंभे धरणाची उपयुक्त साठवण क्षमता 12.37 टीएमसी आहे. रब्बी हंगामाला पाणी पुरेल अशी परिस्थिती असते. परंतु कुकडी प्रकल्पातील साठा यावर्षी 72.53 टक्केच आहे. तोच गेल्या वर्षी 90.42 टक्के होता. त्यामुळे डिंभेच्या पाण्यावरच रब्बी हंगामाचे नियोजन होईल. उन्हाळ्यात मात्र पाणी नगर व सोलापुरला जाईल की नाही याबाबत शाशंकता आहे. 

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

कुकडी प्रकल्पाचा साठा 72.53 टक्के आहे. तोच साठा मागील वर्षी 90.42 टक्के होता. घोड धरणात 0.38 टीएमसी (95.55 टक्के) पाणीसाठा आहे. चिल्हेवाडी धरणात 0.67 टीएमसी (89.29 टक्के) पाणी साठा आहे. 
कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी डिंभे धरणाच्या पाण्यावरून अनेक वेळा जनतेच्या हितासाठी तडजोड केली आहे. सर्वांना पाणी मिळावे या भावनेतून ते यावर तोडगाही काढल्याचे अनेक वेळा पहावयास मिळाले आहे. मात्र डिंभेचे पाणी आंबेगाव, जुन्नर व शिरूरसाठी फार महत्वाचे असते. या परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने पाण्याची शेवटपर्यंत गरज असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dimbhe dam is 99 percent full