

Dimbhe Dam Repair Demand Dilip Walse Patil Seeks 173 Crore as Water Leakage Raises Concern for Farmers and Irrigation
sakal
मंचर: आंबेगाव, जुन्नर, शिरूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) येथील धरणभिंतीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. जर गळती कायम राहिल्यास वर्षभरात जवळपास दोन टीएमसी पाणी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. आगामी रब्बी हंगामाच्या दुष्काळसदृश पार्श्वभूमीवर ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे.