

“No injustice to farmers’ rightful water,” says Walse Patil
Sakal
मंचर : “आमचा कोणत्याही भागाला पाणी देण्याला विरोध नाही. मात्र दुसऱ्या भागाला पाणी देताना आंबेगाव ,जुन्नर ,शिरूर ,व पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर अन्याय होता कामा नये. मूळ कुकडी प्रकल्पाच्या आराखड्यातमाणिकडोह बोगद्याचा उल्लेख नव्हता, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी भूमिका ठाम आहे. हा लढा शेतकऱ्यांसाठी आहे; कोणत्याही व्यक्तीच्या किंवा नेत्याच्या विरोधात नाही. कुणाबरोबर आमचे भांडण कालही नव्हते आणि आजही नाही,” असे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.