Police Recruitment : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तीन तरुणांची एकाच वेळी पोलिस दलात निवड

डिंगोरे (ता. जुन्नर) येथील तीन तरुण घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलिस दलात भरती झाले.
Youths Police Recruitment
Youths Police Recruitmentsakal
Summary

डिंगोरे (ता. जुन्नर) येथील तीन तरुण घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलिस दलात भरती झाले.

ओतूर - डिंगोरे (ता. जुन्नर) येथील तीन तरुण घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलिस दलात भरती झाले. डिंगोरे येथील श्रीराम दशरथ बोऱ्हाडे व आदेश जगन्नाथ मवाळ हे दोन तरुण पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती झाले. तर, रमेश बाबूराव कांबळे या तरुणाची नगर शहर पोलिस दलात निवड झाली. श्रीराम बोऱ्हाडे याचे वडील बनकर फाटा येथे चप्पल दुरुस्तीचे व विक्रीचे छोटेसे दुकान चालवतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रीराम याने एस.वाय.बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच पोलिस दलात निवडीसाठी तो गावातच व्यायामशाळेत सराव करत होता.

तसेच, आदेश मवाळ याचे वडील शेतकरी असून, दोन एकर शेतीतच आपल्या कुटुंबाची गुजराण करत आहेत. आदेश याने शेती कामासह एस.वाय.बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले. याच दरम्यान गावातील व्यायाम शाळेत तो पोलिस भरती परीक्षेची तयारी करत होता. तर, रमेश कांबळे यांचे वडील बाबूराव कांबळे हे मुळचे बीड जिल्ह्यातील असून, डिंगोरे गावात मोलमजुरी करण्यासाठी आले व येथे स्थायिक झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रमेश कांबळे यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले व त्याच बरोबर पोलिस भरतीची पण तयारी केली.

या तीनही तरुणांचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगोरे व पुष्पावती विद्यालयात डिंगोरे येथे झाले. तसेच, श्रीराम बोऱ्हाडे व आदेश मवाळ यांचे एस.वाय.बी.ए.पर्यंतचे शिक्षण अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात चालू आहे. तर, रमेश कांबळे यांचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे झाले.या तीन तरुणांचा पोलिस दलात निवड झाल्याबद्दल डिंगोरे गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबन तांबे, विघ्नहर कारखान्याचे संचालक रघुनाथ लोहोटे, सोसायटी अध्यक्ष जालिंदर उकिर्डे, उपाध्यक्ष एकनाथ शिंगोटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र सुकाळे, राजेंद्र उकिर्डे, अंकुश थापेकर, रवींद्र लोहोटे, बाबाजी मवाळ, गणेश आमले, रमेश सोनवणे, सुरेश आमले, प्रसाद सुकाळे, सचिन सोनवणे, विशाल आमले, विजय मवाळ, विजय आमले, दत्तात्रेय उकिर्डे, समीर लोहोटे, शंकर भिसे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णू शेरकर, सरपंच सीमा सोनवणे व उपसरपंच नीलेश लोहोटे व इतरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com