esakal | उपोषणाला बसलेल्या तमाशा कलावंतांना थेट सांस्कृतिकमंत्र्यांचा फोन
sakal

बोलून बातमी शोधा

benke.jpg

तमाशा फडमालक व कलावंत यांनी विविध मागण्यांसाठी आज सकाळी नारायणगाव (ता. जुन्नर) येथे उपोषण आंदोलन सुरू केले होते. मात्र, राज्यातील तमाशा फडमालक व कलावंत यांच्या आर्थिक व इतर समस्या सोडवण्यासाठी सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत फडमालकांच्या प्रतिनिधीची बैठक बुधवारी (ता. २३) मुंबई येथे घेण्याचे आश्वासन आमदार अतुल बेनके यांनी दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषणाला बसलेल्या तमाशा कलावंतांना थेट सांस्कृतिकमंत्र्यांचा फोन

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : तमाशा फडमालक व कलावंत यांनी विविध मागण्यांसाठी आज सकाळी नारायणगाव (ता. जुन्नर) येथे उपोषण आंदोलन सुरू केले होते. मात्र, राज्यातील तमाशा फडमालक व कलावंत यांच्या आर्थिक व इतर समस्या सोडवण्यासाठी सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत फडमालकांच्या प्रतिनिधीची बैठक बुधवारी (ता. २३) मुंबई येथे घेण्याचे आश्वासन आमदार अतुल बेनके यांनी दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यामुळे तमाशा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे फडमालक व कलावंत यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी नारायणगाव येथे उपोषण सुरू केले होते. या वेळी अखिल भारतीय मराठी तमाशा मंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले, लक्ष्मीकांत खाबिया, तहसीलदार हनुमंत कोळेकर, खंडूराज गायकवाड, शिरीष बोऱ्हाडे, फडमालक मालती इनामदार, अमर पुणेकर, कैलास नारायणगावकर, शिवकन्या बढे, सीमा पोटे आदी उपस्थित होते.

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

दरम्यान, आमदार बेनके यांनी दुपारी उपोषणस्थळी भेट देऊन खेडकर यांच्याशी चर्चा केली. या वेळी सांस्कृतिकमंत्री देशमुख यांनी खेडकर यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधला. बुधवारी (ता. २३) मुंबई येथे आमदार बेनके यांच्या उपस्थितीत फडमालकांच्या प्रतिनिधीची बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले. त्यानंतर आमदार बेनके यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन खेडकर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

हतबल प्रशासनापुढे ‘जम्बो’ समस्या!

कलावंत व फडमालकांच्या मागण्या
 - उदरनिर्वाहासाठी मार्च महिन्यापासून कलावंतांना प्रतिमहिना पाच हजार रुपये मानधन द्यावे.
 - तमाशासाठी स्वतंत्र महामंडळ असावे. 
 - फडमालकांना आर्थिक पॅकेज मिळावे. 
 - तमाशा उभारणीसाठी राष्ट्रीयीकृत बँकेतून २५ लाख रुपयांचे कर्ज मिळावे.
 - ऑक्टोबरपासून तमाशा कार्यक्रमांना परवानगी मिळावी.
 - शासनाने कलावंतांचा विमा काढावा. 
 - फडमालक व कलावंतांच्या मुलांना मोफत शिक्षण व घरकुल योजनेचा लाभ मिळावा. 

 

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत फडमालक व कलावंत राज्याची लोककला जिवंत ठेवण्याचे काम करत आहे. कोरोना संकटामुळे फडमालक कर्जबाजारी झाले असून, कलावंताची उपासमारी सुरू आहे. या प्रश्‍नाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. बुधवारी सांस्कृतिकमंत्री देशमुख यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत फडमालक व कलावंत यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
 - रघुवीर खेडकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत मंडळ