कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी पुणे जिल्ह्यात गंदगी मुक्त अभियान 

corona.jpg
corona.jpg

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी गावा-गावांत खास स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत गंदगी मुक्त भारत अभियानांतर्गत येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासन आणि तसेच नागरीक मोठया प्रमाणात उपाययोजना करत आहेत. त्यानुसार वैयक्तिक शारिरिक व सार्वजनिक  स्वच्छता राखणेही फार आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. 

गंदगी मुक्त भारत स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांच्या स्वच्छतेविषयच्या वर्तनात बदल घडवून आणणे, त्यांच्या आरोग्यदायी सवयी वाढविणे, हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. जिल्हयातील सर्व गावांमध्ये स्वच्छतेबाबतचे दैनंदिन कामे केली जाणार आहेत. 

यामध्ये  हागणदारीमुक्त ग्रामपंचायत, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारीमुक्त सातत्यचे उपक्रम, सार्वजनिक शौचालये, शाळा, अंगणवाडी स्वच्छतागृह आदींच्या स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी व वैयक्तिक स्तरावर आढळणारा प्लॅस्टिक कचरा जमा करून त्याचे विघटन 
 करणे, श्रमदानाव्दारे गावचा परिसर स्वच्छ करणे,  हागणदारीमुक्त गावामध्ये स्वच्छतेत सातत्य राखणे बाबत  जनजागृती करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे. 

या जनजागृतीसाठी गावातील भिंतीवर स्वच्छताविषयक म्हणी लिहिणे, चित्र रंगवणे, पर्यावरण संतुलनाकरिता गावामध्ये वृक्षारोपण करणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी गंदगी मुक्त मेरा गाव या विषयाव ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित करणे, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी  ऑनलाईन निंबध स्पर्धां आयोजित करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 

याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र  व ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवून आरोग्य केंद्र, रुग्णालये व परिसर स्वच्छ करणे, स्वातंत्र्यदिनी गावच्या ग्रामसभेत हागणदारीमुक्तोत्तर गाव कार्यक्रमाची घोषणा करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हे सर्व उपक्रम ग्रामपंचायत, आरोग्य व शिक्षण विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांनी सांगितले. 

मार्गदर्शनासाठी टोल फ्री क्रमांक- जिल्ह्यातील जी गावे हागणदारीमुक्त झालेली आहेत. अशा गावांमध्ये याबाबतचे सातत्य राखले जावे, यासाठी अशा गावांमध्ये हागणदारीमुक्तोत्तर गावांना (ओडीएफ प्लस) दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी एक टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक १८००१८००४४ असा आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com