क्वारंटाइन सेंटर की घाणीचं सेंटर ; कोथरुडमधील 'त्या' केंद्राची अवस्था पाहून तुम्हालाही येईल किळस

जितेंद्र मैड
बुधवार, 1 जुलै 2020

कोथरुडमध्ये वस्ती भागाबरोबरच विविध सोसायट्यांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला असून नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दरम्यान कोरोनाग्रस्तांना क्वारंटाइन केलेल्या जागांची व्यवस्थित स्वच्छता राखली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कोथरुड (पुणे) : कोथरुडमध्ये वस्ती भागाबरोबरच विविध सोसायट्यांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला असून नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दरम्यान कोरोनाग्रस्तांना क्वारंटाइन केलेल्या जागांची व्यवस्थित स्वच्छता राखली जात नसल्याचा आरोप आरती गायकवाड, आशा जमदाडे, सारीका चोरघडे यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जयभवानीनगर मधील रहिवाशी चोरघडे म्हणाल्या की, जयभवानीनगर येथील क्वारंटाइन केंद्रामध्ये महिला व पुरुषांना स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध नाही. या स्वच्छतागृहाची वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्याने अस्वच्छता जास्त दिसते. एवढेच नव्हे तर येथील खोल्यांची व गाद्यांची वेळच्यावेळी स्वच्छता केली जात नाही. अगोदरच्या लोकांनी वापरलेल्या गाद्याच स्वच्छ न करता नव्याने आलेल्या लोकांना दिल्या जातात. पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केलेली नाही.
आशा जमदाडे म्हणाल्या की, इथे सॅनिटायझर नाही. कचरा काढत नाही की, खोल्या साफ केल्या जात नाहीत.

खबरदार ! सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा...

स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत. काल काही लोकांना जुलाब झाले. क्वारंटाइन सेंटर मध्ये राहणा-या लोकांचे आरोग्य धोक्यात जाणार नाही याची काळजी महापालिकेने घ्यावी.
आरती गायकवाड म्हणाल्या की, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना येथील शाळेत एकत्र ठेवले जाते. यात काही व्यक्ती पॉझिटीव्ह निघण्याची शक्यता असते. त्यामुळे या व्यक्तींमध्ये योग्य अंतर रहावे, त्यांनी आपापाली काळजी घ्यावी यासाठी समुपदेशन करणे गरजेचे असते. परंतु, तसे काहीही होत नाही. क्वारंटाइन केलेले अनेक जण डिप्रेशनमध्ये जातात. काही जण हींसक बनल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे क्वारंटाइन सेंटरची योग्य देखभाल करावी, स्वच्छता राखावी.

कोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाची एन्ट्री; आयटी अभियंत्यास कोरोनाची लागण

कोथरुड @ 555

कोथरुडमधील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 555 झाली आहे. यापैकी 271 लोक कोरोनामुक्त झाले असून 272 लोक उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 12 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोथरुड डेपो, बावधन प्रभाग क्रं. 10 मध्ये 160, शिवतीर्थनगर, रामबाग कॉलनी प्रभाग क्रं. 11 मध्ये 265 व मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी प्रभाग क्रं. 12 मध्ये 130 जणांना कोरोना झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dirty at the Quarantine Center in Kothrud