मुलांनी गाजवली आंब्यांवर हुकूमत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पुणे - आंबे, कैरीचा स्वाद असलेल्या रंगीबेरंगी चॉकलेट्‌सवर यथेच्छ ताव मारल्यानंतर काही वेळ डोरेमॉन, मिकी माउस, बालगणेश या ‘कार्टून’ पात्रांबरोबर धम्माल मस्ती... आणि त्यानंतर क्षणार्धात सुरू झाली, आंबे खाण्याची स्पर्धा. काही जण एक-दोन आंबे खाताच, ‘काका नको आता’ असे म्हणू लागले, तर दुसरीकडे आंब्याच्या साली, कोयींचे ढीग चढू लागले. दृष्टिहीन, विशेष, अपंग आणि सामान्य मुलांनी गुरुवारच्या सायंकाळची काही मिनिटे अक्षरशः आंब्यावर हुकूमत गाजवत आंबे खाण्याचा, ‘डिजे’च्या तालावर नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला.  

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे वंचित व विशेष मुलांसाठी ‘निरंजन मॅंगो मस्ती आंबे खाणे स्पर्धा’ शुभारंभ लॉन्स येथे घेण्यात आली. या वेळी शुभांगी जाजू, संध्या झंवर, दीपाली मुंदडा, श्‍यामसुंदर मुंदडा, जगदीश मुंदडा, व्यावसायिक सुरेश शर्मा, जयेश कासट आदी उपस्थित होते. अभिनेत्री रीना लिमण, सुवर्णा काळे व बालकलाकार साक्षी तिसगावकर यांनीही या कार्यक्रमात आवर्जून सहभाग घेतला.

दुपारी चार वाजल्यापासूनच शाळा, नूतन समर्थ विद्यालय, माहेर फाउंडेशन, धर्मवीर संभाजीराजे अनाथाश्रम, लोकमंगल फाउंडेशन या संस्थांतील अंध मुले येण्यास सुरवात केली. काही क्षणातच मुलांसमोरील ताटामध्ये पिवळेधम्मक आंबे आले, काहींनी स्पर्धेची घोषणा होण्यापूर्वीच आंब्यांवर ताव मारण्यास सुरवात केली. स्पर्धेची रंगत वाढू लागली, तसतशी मुलांमध्ये आंबे खाण्याची जोरदार स्पर्धा सुरू झाली. आंबा गोल फिरवत पिळण्यापासून ते हात-तोंड, कपडे भरेपर्यंत त्यावर ताव मारण्याचे काम मुलांनी केले. काही मुले पटकन थकली, तर काही जणांनी भरपूर आंब्यांचा आस्वाद घेतला. या स्पर्धेतील अडीच हजार आंब्यांच्या कोयी संस्थेतर्फे राजगड, वेल्हे व मुळशीतील नांदगाव परिसरात लावण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कोळपकर व विराज तावरे यांनी केले.

Web Title: Disabled and normal children eat mango

टॅग्स