

Pune to Witness Hunger Strike as Disabled Students Seek Reservation Rights in Hostels
esakal
पुणे: सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेले समांतर आरक्षण रद्द करून, केंद्र शासनाच्या कायद्यानुसार स्वतंत्र ५ टक्के आरक्षण लागू करण्याच्या प्रमुख मागणीचा आग्रह धरत राज्यातील दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या सोमवार, १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे हे राज्यस्तरीय आंदोलन सुरू होणार असून, त्यात अन्नत्याग उपोषणाचा समावेश आहे.