esakal | 'परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावर चर्चा करा'; कुलगुरूंकडे कुणी केली ही मागणी!

बोलून बातमी शोधा

SPPU-Students

विद्यार्थ्यांचे पुढील अभ्यासक्रमांचे प्रवेश, परदेशी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांचे प्रवेश, नोकरीच्या संधी या गोष्टींवर विपरित परिणाम होणार असल्याने, ह्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होत आहे.

'परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावर चर्चा करा'; कुलगुरूंकडे कुणी केली ही मागणी!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याच काही अडचणी असल्यातरी त्यावर योग्य नियोजनातून मार्ग निघू शकतो. पण परीक्षा रद्द करणे योग्य नाही. यावर चर्चा करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांची ऑनलाईन बैठक घ्यावी, अशी मागणी सदस्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारने अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पाठविले आहे. त्यावर 'यूजीसी'ने निर्णय दिलेला नसला तरी हा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे पुढील अभ्यासक्रमांचे प्रवेश, परदेशी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांचे प्रवेश, नोकरीच्या संधी या गोष्टींवर विपरित परिणाम होणार असल्याने, ह्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होत आहे.

- कोरोना संबंधातील 10 महत्त्वाच्या बातम्या; वाचा एका क्लिकवर

अधिसभा सदस्य प्रा शामकांत देशमुख, डॉ. संजय खरात, संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर, शशिकांत तिकोटे, बागेश्री मंथाळकर यांनी यासंदर्भात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 पुणेकरांनो, मार्केट यार्डाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

प्रा. शामकांत देशमुख म्हणाले, "विद्यापीठाच्या अंतिम सत्राची परीक्षा रद्द करणे योग्य नाही. या निर्णयासंदर्भात सांगोपांग विचारमंथन, विद्यापीठाच्या अंतिम अधिकार मंडळाचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी झूमद्वारे बैठक द्यावी अशी मागणी केली आहे.

- कोरोनाचा फटका 'पीएमपी'लाही; 67 दिवसांत झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान!

विद्यापीठही नाही अनुकूल
राज्य सरकारने अंतीम वर्षाची परीक्षा रद्द करण्यासाठी 'यूजीसी'ची परवानगी मागितली आहे. ती न मिळाल्यास स्वतःच्या अधिकारात परीक्षा रद्द करण्यासाठी बैठक घेतली जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. विद्यापीठाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी परीक्षा झाली पाहिजे असे मत विद्यापीठातील अनेक वरिष्ठांचे मत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा