esakal | पुणेकरांनो, मार्केट यार्डाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

Market_Yard.jpg

भुसार बाजार सोमवारपासून सुरु करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणेकरांनो, मार्केट यार्डाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : मार्केट यार्डातील भुसार बाजारात काही व्यापाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे दि पूना मर्चंटस् चेंबरने बाजार बंदचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी भुसार बाजार तातडीने सुरू करण्याचे आदेश गुरूवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यापाऱ्यांना दिले आहेत.

दिलासादायक बातमी : ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी झाली यशस्वी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत बाजार बंद ठेवता कामा नये, अशा स्पष्ट सूचना गेल्या आठवड्यात दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे प्रशासक आणि व्यापाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी बैठक घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, पुना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, नगरसेवक प्रवीण चोरबेले आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुण्यातील गणेश मंडळांचा `तो` निर्णय स्वागतार्ह; राज्यातील सर्व गणेश मंडळांना उपमुख्यमंत्र्य़ांनी केलं आवाहन! 

कोरोनाच्या काळात सलग दोन महिने भुसार बाजार नियमित सुरू होता. परंतु व्यापाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने चेंबरने बाजार बंदचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणखी दोन दिवस बाजार बंद ठेवण्यास परवानगी द्यावी. तसेच शनिवारी कार्यकारणीची बैठक घेऊन सोमवारपासून बाजार पुन्हा सुरू करू, अशी विनंती यावेळी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना केली. मागणी मान्य करत कोरोनाबाबत आवश्यक काळजी घेऊन २५ मे पासून भुसार बाजार पुन्हा सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

मार्केटयार्डातील भुसार बाजारात कोरोनाची लागण होऊन एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन चेंबरने भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शनिवारी कार्यकारणीची बैठक घेऊन येत्या सोमवारपासून ( ता.२५ मे) भूसार बाजार पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती ओस्तवल यांनी दिली.