मंत्री छगन भुजबळांनी घेतला झुणका-भाकरीचा आस्वाद

प्रविण डोके
Friday, 27 November 2020

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हमाल पंचायतच्या कष्टाची भाकर उपक्रमास भेट दिली. तसेच झुणका आणि भाकरीचा आस्वाद घेत कष्टाच्या भाकरीची चव चाखली.

मार्केट यार्ड  : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हमाल पंचायतच्या कष्टाची भाकर उपक्रमास भेट दिली. तसेच झुणका आणि भाकरीचा आस्वाद घेत कष्टाच्या भाकरीची चव चाखली. झुणक्याची चव आवडल्याने त्यांनी तो पुन्हा मागवला. हमाल पंचायतच्या ‘कष्टाची भाकर’ या उपक्रमास सवलतीच्या दरात धान्य पुरवठा केला जात होता. परंतु मागील वर्षीपासून तो बंद केला आहे. सवलतीच्या दराने धान्य पुरवठा पुर्ववत करावा, या मागणी संदर्भात मंत्री भुजबळ आणि जेष्ठ कामगार नेते डॉ.बाबा आढाव यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली.

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भुजबळ यांनी आढाव यांच्याकडून सद्य:परिस्थिती जाणून घेतली. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष किसन काळे, सचिव संतोष नागरे, खजिनदार विजय चोरघे, हमाल पंचायत कष्टकरीचे चंद्रकांत मानकर, दिलीप मानकर, गोरख मेंगडे तसेच अंगमेहनती कष्टकरी
संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार उपस्थित होते.

सवलतीच्या दरात बंद झालेला धान्य पुरवठा पुन्हा सुरळीतपणे कसा चालु करता येईल, याबाबत लवकरच संबंधित अधिकारी यांच्यामध्ये चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. धान्य पुरवठा हा केंद्र सरकारकडून होत असतो. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुन बाबांनी एक पर्याय दिला तर या विषयाबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे सोपे होईल, असे देखील भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

व्याजाच्या पैशांवरुन व्यावसायिकाचे अपहरण करुन बेदम मारहाण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion between Chhagan Bhujbal and Baba Adhav

Tags
टॉपिकस
Topic Tags: