लॉकडाऊननंतर शिकवायचे कसे ? पुण्यात संस्थाचालकांच्या ऑनलाईन चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

discussion on How to teach after lockdown in Pune


"कोरोना' लॉकडाऊनमुळे महाविद्यालयांच्या परिक्षा रखडल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा व पुढील वर्षाच्या प्रवेशाचे नियोजन सुरू केले आहे. "यूजीसी'ने नुकतेच शैक्षणीक वर्ष जुलै ऐवजी सप्टेंबर पासून सुरू करण्याची सूचना विद्यापीठांना दिली आहे. त्यामुळे नवे शैक्षणिक वर्षाचा कालावधी दोन महिने उशीरा सुरू होणार असल्याने यामध्ये अनेक बदल होणार आहेत. याचाच विचार करण्यासाठी पुण्यातील काही संस्थाचालक एकत्र येऊन त्यांनी ऑनलाईन बैठका सुरू केल्या आहेत. त्यातून धोरण निश्‍चीत केले जाणार आहे.

लॉकडाऊननंतर शिकवायचे कसे ? पुण्यात संस्थाचालकांच्या ऑनलाईन चर्चा

पुणे : रेड झोनमध्ये असलेल्या पुण्यात लॉकडाऊन संपल्यानंतर महाविद्यालयांमध्ये वर्ग कसे भरवायचे, सामाजिक अंतर कसे राखायचे याचे आव्हान शिक्षण संस्थांच्या समोर आहे. यावर विचारमंथन करण्यासाठी पुण्यातील शिक्षण संस्थांचे प्रमुख एकत्र आले असून, यावर तोडगा काढण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जाणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना' लॉकडाऊनमुळे महाविद्यालयांच्या परिक्षा रखडल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा व पुढील वर्षाच्या प्रवेशाचे नियोजन सुरू केले आहे. "यूजीसी'ने नुकतेच शैक्षणीक वर्ष जुलै ऐवजी सप्टेंबरपासून सुरू करण्याची सूचना विद्यापीठांना दिली आहे. त्यामुळे नवे शैक्षणिक वर्षाचा कालावधी दोन महिने उशीरा सुरू होणार असल्याने यामध्ये अनेक बदल होणार आहेत. याचाच विचार करण्यासाठी पुण्यातील काही संस्थाचालक एकत्र येऊन त्यांनी ऑनलाईन बैठका सुरू केल्या आहेत. त्यातून धोरण निश्‍चित केले जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, कर्वे संस्था, खडकी एज्युकेशन सोसायटी, मॉडर्न एज्युकेसन सोसायटी या मोठ्या संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे "कोरोना'चा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी 'सामाजिक अंतर' राखणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी ठेऊन, त्यांचे वर्ग कसे सुरू व्हावेत, प्रॉक्‍टिकल कसे घ्यावेत, प्राध्यापकांनी ऑनलाईन व प्रत्यक्षात वर्गात अशा दोन्ही पद्धतीने कसे शिकवता येईल. महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज कसे चालवता येईल यावर चर्चा झाली आहे.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, ''लॉकडाऊन संपल्यानंतर महाविद्यालयात वर्ग कसे भरावेत, विद्यार्थी, प्राध्यापक सुरक्षीत राहून अध्यापनाचे कार्य कसे सुरू राहिल यावर या बैठकीत चर्चा झाली. यापुढे आणखी चर्चा होऊन नवे मार्ग निर्माण होतील. सप्टेंबरमध्ये वर्ग सुरू होणार असल्याने याबाबत विचार करण्यासाठी पुरेसा वेळ आहे.''

विद्यार्थ्यांनो. बारावीच्या गणितात 'असा' करा सेल्फ स्टडी

शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष ऍड एस. के जैन म्हणाले, "लॉकडाऊन मुळे शिक्षण पद्धतीच बदलून जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यावर चिंतन करण्यासाठी काही महाविद्यालयांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. पुढील टप्प्यात आणखी संस्थांची यात भर पडेल. महाविद्यालयात कमी विद्यार्थी येतील व ऑनलाईन शिकवण्यावर भर देता येईल अशी फ्लीपकार्ड पद्धती स्विकारावी लागणार आहे.सुरक्षीत व भयमुक्त वातावरणात कसे शिक्षण देता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे.''

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचयं? करियर आणि बिझनेसमध्ये 'या' आहेत संधी

चर्चेत समोर आलेले मुद्दे
- एका वेळी वर्गात कमीत कमी मुले असावीत
- आठवड्यातून एक किंवा दोन दिवस महाविद्यालय शिक्षण
- प्राध्यापकांना ऑनलाईनसाठी आखणी प्रशिक्षण देणे
- प्रॅक्‍टिकलमध्ये सामाजिक अंतराचे पालन करावे