चर्चा तर होणारच! कार्यक्रमापेक्षा आमदारांच्या पेहरावाचीच तालुक्यात चर्चा

चर्चा तर होणारच! कार्यक्रमापेक्षा आमदारांच्या पेहरावाचीच तालुक्यात चर्चा

माळशिरस (पुणे) : म्हटलं जातं की माणसाचा पेहराव हीच माणसाची ओळख असते. मात्र, माणसाने नेहमीपेक्षा वेगळा पेहराव परिधान केल्यास तो नेहमी चर्चेचा विषय होतो, याचा प्रत्यय आज माळशिरस येथे आला. कार्यक्रमापेक्षा देखील येथे सर्वाधिक व संपूर्ण तालुकाभर चर्चा झाली, ती आमदार संजय जगताप यांच्या डोक्यावरील धनगरी फेटा, खांद्यावरील घोंगडी व हातात असणाऱ्या काठीची.

माळशिरस येथील किल्ले वस्तीवरील धनगर बांधवांनी आपले श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिरांसमोर लोकवर्गणीतून समाजाच्या सभामंडपाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे भूमिपूजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या जगताप यांना येथील धनगर बांधवांनी आपल्या पारंपरिक पिवळ्या रंगाचा फेटा त्यांना बांधला. खांद्यावरती शालऐवजी आपली खास धनगरी घोंगडी टाकली. त्यानंतर हातामध्ये खास रेखीव करून घेतलेली धनगरी काठी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार जगताप यांना हा पेहराव अत्यंत उठून दिसत असल्याने तेथे उपस्थित सर्वच तरुण कार्यकर्त्यांसह ज्येष्ठांनी आमदारांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. अनेकांनी या पेहरावावरील आमदारांच्या चालीचा व्हिडिओ तयार केला. कार्यक्रमाला आणि कार्यक्रमानंतर आमदारांच्या खास पेहरावाचीच चर्चा सर्वत्र झाली. यामुळे आमदारसाहेबांचा चेहरा खुलून दिसत होता. तसेच, कार्यक्रमाला आमदारांनी हजेरी लावल्यामुळे धनगर समाजातील लोकांचे चेहरेही तितकेच खुलले होते.

सोशल मीडियावर दिवसभर चर्चा

आमदारांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पेहरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे दिवसभर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू होती. यामुळे माळशिरस परिसरातील हा छोटासा कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय होऊन सर्वांपर्यंत पोहोचला .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com