सुप्रियाताईंनी मजुरांना विचारले, सॅनीटायझर वापरता का? 

विजय मोरे
Wednesday, 17 June 2020

रोजगार हमी योजनेअंतर्गत अंजनगाव शिव रस्ता ते जळगाव सुपे या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामावर सध्या 226 मजूर काम करत आहेत. या कामाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देवून रस्त्याची पाहणी केली.

उंडवडी (पुणे) : बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अचानक भेट देवून कामावर असलेल्या मजुरांशी संवाद साधून विचारपूस केली. सॅनीटायझर वापरता का, सुरक्षितता बाळगता का? असे प्रश्न विचारले.

झेडपीच्या शाळांची घंटा 1 आॅगस्टला वाजणार

या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, उपसभापती प्रदीप धापटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी सरपंच लक्ष्मणराव जगताप, सरपंच अंजना खोमणे, उपसरपंच मीराबाई जगताप, ग्रामसेवक गणेश लडकत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

झेडपीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षक करतात असं काही

जळगाव सुपे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्या महिन्यापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत अंजनगाव शिव रस्ता ते जळगाव सुपे या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामावर सध्या 226 मजूर काम करत आहेत. या कामाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देवून रस्त्याची पाहणी केली. या वेळी त्यांनी या कामावर काम करत असलेल्या मजूरांशी संवाद साधून माहिती घेतली. 

पुण्यात आरटीओचे कामकाज पूर्ववत होणार

या वेळी सुळे यांनी मजुरांना काम कसं चालले आहे, कामाचे पगार बॅंक खात्यावर वेळेत होतात का, मास्क सनीटायझर वापरता का, सुरक्षितता बाळगता का? असे प्रश्न विचारले. तसेच, रोजगार हमीतून झालेल्या कामाचे कौतुक केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी ग्रामसेवक गणेश लडकत व रोजगार सेवक राधेश्याम खोमणे यांनी या कामाची तांत्रिक माहिती खासदार सुळे यांना दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion by MP Supriya Sule with the workers of Baramati Employment Guarantee Scheme