PUNE : टाकाऊतून टिकाऊ चे बिबवेवाडीत प्रदर्शन 67 वर्षीय आजीचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PUNE : टाकाऊतून टिकाऊ चे बिबवेवाडीत प्रदर्शन 67 वर्षीय आजीचा उपक्रम

PUNE : टाकाऊतून टिकाऊ चे बिबवेवाडीत प्रदर्शन 67 वर्षीय आजीचा उपक्रम

बिबवेवाडी : दैनंदिन जीवनातील अनेक टाकाऊ, निरुपयोगी वस्तू कपड्याच्या चिंध्या, दोऱ्या पासून ते काचेच्या तुकड्या पर्यंत फेकून न देता त्याला आकर्षक रूप देण्याचा आगळा वेगळा छंद पद्मा रादंड यांनी जोपासला असून नवीन पिढीला टाकाऊ कचऱ्यापेक्षा त्यातून काही नवीन निर्माण करण्याबाबत प्रोत्साहन मिळण्यासाठी बिबवेवाडीतील खाऊ गल्लीतील स्वतःच्या सदनिकेमध्ये मोफत प्रदर्शन भरविले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अपर्णा वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ.स्मिता घुले, डॉ.सोनाली भोजने व मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: मतदारांसाठी इच्छुकांकडून पायघड्या, मंडप टाकून दिली जातेयं सेवा

पद्मा रादंड लहान असताना त्यांच्या घराचे पानशेत धरण फुटीच्या पुरात होत्याच नव्हते झाले होते त्यामुळे काटकसरीची लहानपणीच सवय लागली होती, कोणतीही वस्तू खराब झाली तरी फेकून देण्याऐवजी तिचा वापर कसा कराता येईल या विचारातून त्यांनी टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्याची कला जोपासली त्यातून त्यांनी जुना स्टोव्ह, इस्त्री, गॅसबत्ती, पाटा, जाते यांना वेगळ्या प्रकारचे रूप देत त्याच बरोबर कापडाच्या चिंध्या, कापडी पिशव्या, प्लास्टिक च्या पाण्याच्या बाटल्या, झाकणे, जुने टायर, मडकी, नारळाच्या करवंट्या, काचेच्या बांगड्या, दोरे, जुन्या पंख्याच्या झाल्या यातून फ्रेंडशिप बँड, फुलदाण्या ते अत्याधुनिक बैठक वेवस्था तयार केली आहे. टाकाऊ निरुपयोगीतून अँटिक वस्तू बनवून अडगळीत पडलेल्या जुन्या वस्तुंना संसारात नवीन संजीवनी मिळवून देण्याचा छंद पद्माताईनी जपला आहे.

हेही वाचा: दत्तात्रय यांच्या मिनी जिप्सीतून 'कृषीराज्यमंत्री' यांनी मारला फेरफटका

मोबाईल च्या जमान्यात अनेक कला लोप पावल्या आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानात जाण्याऐवजी मोबाईलवर खेळत बसतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून टाकाऊ वृत्ती वाढत आहे त्यामुळे टाकाऊ वस्तूंचा कचरा वाढत असून निसर्ग चक्राला हानी पोहचत आहे, लहानपणापासून मुलाना व जेष्ठांना छंद लागावा यासाठी प्रदर्शनाचे आयोजन केले असून चाळीशीनंतर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजाराला सामोरे जावे लागते त्यामुळे अशा परिस्थितीत या कला छंदांचा उपयोग होत असून मन ताजेतवाने व उत्साही राहण्यास मदत होत असल्याचे पद्माताई आवर्जून सांगतात. आठवड्यातील दर शनिवारी व रविवारी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शन मोफत पाहता येणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsDisposal
loading image
go to top