esakal | 'महाआघाडी'त बिघाडी; शिवसेना-राष्ट्रवादीमधील वादाची चर्चा

बोलून बातमी शोधा

Shivsena V NCP
'महाआघाडी'त बिघाडी; शिवसेना-राष्ट्रवादीमधील वादाची चर्चा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाघोली : जिल्हा परिषद(Pune Zilha Parishad) सदस्य आणि शिवसेना नेते ज्ञानेश्वर कटके (Dyaneshwar Katake) यांनी वाघोलीतील (Wagholi) काही सोसायटीमध्ये जाऊन लसीकरण (Vaccination) केल्याने वाद (Disputes) निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी आक्षेप घेत जिल्हा परिषदेचे(ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद(Chief Executive Officer Ayush Prasad) यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान याबाबत चौकशीचे आदेश(Order of inquiry) देण्यात आल्याचे कळते. स्थानिक पातळीवरील महाआघाडीतील(Maha Vikas Aaghadi) ही बिघाडी चांगलीच चर्चेत आली आहे.

''वाघोलीत बीजेएस हॉल(BJS Hall)मध्ये लसीकरण केंद्र(Vaccination Center) सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कटके यांनी काही सोसायटीमध्ये जाऊन लसीकरण राबविले. याबाबत डॉ. कोल्हे यांनी आक्षेप घेतला. यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. (Disputes dr Amol Kolhe ZP member Dnyaneshwar Katke Wagholi vaccine)

हेही वाचा: पुण्याला हवाय रोज ५० टन ऑक्सिजन

img

dr Amol Kolhe and ZP member Dnyaneshwar Katke

डॉ कोल्हे यांच्या आक्षेपा वर शिवसेना व भाजप पदाधिकार्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ला सुरू केला आहे. नागरिकांचा जीव महत्वाचा की तुमचे राजकारण? सोसायटी मधील नागरिक काय पाकिस्तानमधील आहेत का? खासदार कोल्हे यांचा निषेध'' असे राजकारण सुरू झाल्यास ग्रामीण भागातील छोट्या गावातील केंद्र बंद होतील. असा सूर सोशल मीडियातून उमठत आहे. बी जे एस लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना नंबर देण्यासाठी कटके यांनी स्लीप तयार केल्या आहेत यावर पक्षाचे व स्वतःहाचे छायाचित्र व माहिती छापली आहे. त्यावरही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्षेप घेत आहेत. राज्यात महा आघाडी सरकार आहेत. यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन महत्वाचे घटक आहेत. तरी सुद्धा हा वाद चांगलाच रंगल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा: परदेशी शिक्षणासाठीची दिशाभूल थांबणार; विद्यार्थ्यांनी सुरू केलं स्टार्ट-अप

''अंध, दिव्यांग, आजारी असणाऱ्या वृद्ध व्यक्ती यासाठी सोसायटीमध्ये जाऊन लसीकरण मोहीम राबविण्यात आली. केंद्रावरील गर्दी कमी करणे हा ही त्यामागील उद्देश होता. वाघोली व परिसरातील लोकसंख्येचा विचार करता लसीकरण झपाट्याने व्हावे यासाठी ही मोहीम राबविली. वाघोलीत सुरक्षित लसीकरण सुरू असून आता पर्यंत 17 हजार पेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. मग ही मोहीम राबविल्यास त्यात गैर काय ?''

- ज्ञानेश्वर कटके, जिल्हा परिषद सदस्य

''लसीकरणानंतर लस घेणाऱ्या व्यक्तीला अर्धातास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली बसविले जाते. आय सी एम आर च्या मार्गदर्शक सुचनेनुसारच लसीकरण होणे गरजेचे आहे. सोसायटी मध्ये जाऊन करणे म्हणजे त्यांच्या सूचनांचे उलंघन होते.''

- प्रशांत शिर्के, गटविकास अधिकारी, हवेली पंचायत समिती.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा