esakal | परदेशी शिक्षणासाठीची दिशाभूल थांबणार; विद्यार्थ्यांनी सुरू केलं स्टार्ट-अप

बोलून बातमी शोधा

foreign education
परदेशी शिक्षणासाठीची दिशाभूल थांबणार; विद्यार्थ्यांनी सुरू केलं स्टार्ट-अप
sakal_logo
By
- अरुण सुर्वे

पुणे : उच्च शिक्षणाची जिद्द आणि इच्छा तसेच प्रचंड बुद्धिमत्ता, भरपूर गुण असूनही केवळ चुकीच्या सल्ल्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत नाहीत. वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठात निश्चित प्रवेश मिळतो. जगातील अव्वल दर्जाच्या विद्यापीठांमध्ये सहजतेने प्रवेश मिळावा, यासाठी ‘इनफॉरन्स स्टार्ट अप’ची स्थापना केली असून यामार्फत विद्यार्थ्यांना मोफत सल्ला मिळणार आहे.

क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, लंडनचे श्रीरामपूर येथील विद्यार्थी यश गुलाटी आणि युनायटेड किंग्डमयेथील वारविक युनिव्हर्सिटीची पुणे येथील विद्यार्थिनी देविका घोषाल यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ‘इनफॉरन्स’ची स्थापना केली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पोलिटिकल सायन्स यांसह २५ वेगवेगळ्या देशांतील ३५ हून अधिक सर्वोत्तम अशा विद्यापीठांमधील विद्यार्थी ‘इनफॉरन्स’चे सदस्य असल्याचे यश व देविका यांनी सांगितले.

हेही वाचा: पुण्यात आजही लसीकरण बंद

विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात?

  1. खासगी शैक्षणिक सल्लागार हे सल्ला देण्याच्या बदल्यात मोठी रक्कम आकारतात.

  2. केवळ शुल्क भरणारे विद्यार्थीच शैक्षणिक सल्लागारांपर्यंत पोचतात.

  3. ज्यांच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आणि विविध कौशल्ये आहेत, पण शैक्षणिक शुल्क भरण्याची क्षमता आणि माहिती नसते, त्यांना अडचणी येतात.

  4. खासगी शिक्षण सल्लागार एकाच माहितीपत्रकात माहिती भरून घेऊन दर्जा नसलेल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.

  5. अर्ज करण्याच्या प्रक्रियेची व्यावहारिकता विद्यार्थ्यांना माहिती नसते.

‘इनफॉरन्स’ काय करणार ?

  1. जगातील चांगल्या विद्यापीठांत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सीव्ही, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि अर्ज कसा व कुठे करावा याबाबतचा पूर्ण व योग्य सल्ला देणार.

  2. परदेशात शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे स्वतंत्र व्यासपीठ तयार करणार.

  3. जगातील पहिल्या सर्वोत्तम १०० विद्यापीठांत भारतातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणार.

  4. जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी काम करणार.

हेही वाचा: नंदीग्राममध्ये पराभव; ममता मुख्यमंत्री कशा होणार?

''जगातील विद्यापीठात शिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठीच ‘इनफॉरन्स स्टार्ट अप’ची स्थापना केली आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये शिकणाऱ्या भारतातील विद्यार्थ्यांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. जगातील पहिल्या सर्वोत्तम १०० विद्यापीठांत भारतातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या ‘इनफॉरन्स’कडून अचूक सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ''

- यश गुलाटी,संस्थापक, इनफॉरन्स

img

- यश गुलाटी,संस्थापक, इनफॉरन्स

हेही वाचा: पुण्याला हवाय रोज ५० टन ऑक्सिजन

''केवळ परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळावा, हा उद्देश नसून विद्यार्थ्यांची आवड, दृष्टी आणि भविष्यातील योजना त्यांना समजणे आणि समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आज अनेक शैक्षणिक सल्लागार व्यावसायिक आहेत. या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात ते कधीच गेलेले नाहीत. त्यांना अनुभव नसल्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते केवळ जुजबी आणि साधारण सल्ले देतात. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.''

- देविका घोषाल, संस्थापक, इनफॉरन्स

img

देविका घोषाल, संस्थापक, इनफॉरन्स

हेही वाचा: रात्रीतून लस उत्पादन वाढ अशक्य; आदर पूनावाला

मोबाईल नंबर : +९१ ९५६१८ ८४८८३, +४४ ७५८७० ३९८५३

ई- मेल : contact@inforens.com

वेबसाइट : www.inforens.com

- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे दरवर्षी शिक्षण घेणारे विद्यार्थी : १४ लाखांहून अधिक

- युनायटेड किंग्डम येथे दरवर्षी शिक्षण घेणारे विद्यार्थी : ६ लाखांहून अधिक

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा