esakal | आरोग्य सुविधांचे सर्व तालुक्यांना समन्यायी वाटप करा : विजय शिवतारे
sakal

बोलून बातमी शोधा

vijay shivtare

आरोग्य सुविधांचे सर्व तालुक्यांना समन्यायी वाटप करा : विजय शिवतारे

sakal_logo
By
श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

सासवड : पुरंदर-हवेलीचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज पुरंदर व लगतच्या हवेली तालुक्यातील भयंकर परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारली. पुरंदर हवेलीतील भयंकर परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना भेटून सर्व परिस्थिती पुराव्यांसह निदर्शनास आणून दिली. रेमडीसीवीर पुरवठा आणि कोविशिल्ड लस यांचा ओघ ठराविक तालुक्यांमध्ये सुरू आहे. ज्या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत... त्या पुरंदर आणि हवेलीला मात्र पक्षपातीपणे वागवले जात आहे. आरोग्य सुविधांचे समन्यायी वाटप करण्याबाबत आज जिल्हा प्रशासनाला त्यांनी बजावून सांगितले.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ते म्हणाले की., कोविड सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या निकृष्ट जेवणाचा दर्जा सुधारण्याची मागणीही आम्ही केली. ऑक्सिजन कमी पडू लागल्यामुळे आणखी एक मोठे संकट समोर येत आहे. पुरंदर हवेलीसह पुणे जिल्ह्यासाठी जेजुरी येथे एक ते दीड कोटी खर्चून ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मी तयार आहे. त्यासाठी आवश्यक परवानग्या युद्ध पातळीवर द्याव्यात. ते पुढे म्हणाले., कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात प्रोटीनसाठी आवश्यक अंड्यांचा समावेश दिसत नाही. त्यामुळे यापुढे सर्व रुग्णांना अंडी मी स्वखर्चाने पुरवणार आहे. रेशनिंगवरील अन्नधान्य वितरण करताना बायोमेट्रीक मशीनवर हाताचे ठसे घेऊ नयेत. त्यामुळे कोरोनाचा मोठा फैलाव होत आहे असे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यावर कार्यवाहीच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड बंद होणार सांगून, आजोबांची पावणे दोन लाखांची फसवणूक

वरील सर्व बाबतीत जिल्हाधिकारी महोदयांनी अन्न औषध प्रशासन विभाग, आरोग्य विभाग आणि औद्योगिक विकास महामंडळ यांना सूचना देत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व मदत मी माझ्या लोकांना करीत आहे. ही चळवळ सरकार अथवा महाविकास आघाडीच्या विरोधात नसून सुविधांचे जिल्हा स्तरावरून समन्यायी वाटप व्हावे., यासाठी आहे. जिल्हा प्रशासनाला याबाबत मी आज निक्षून सांगितले आहे. भविष्यात त्यात सुधार होईल., अशी अपेक्षा आहे.

शिवतारे स्वतः तर्फे कोविड सेंटरला तयार- दिवे (ता. पुरंदर) येथील आयटीआय इमारतीमध्ये स्वखर्चाने २०० बेडचे कोविड सेंटर सुरू करीत असल्याचे सांगून त्यास परवानग्या आणि आवश्यक मनुष्यबळ द्यावे, असे शिवतारे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना सांगितले.

loading image