मोहितेवाडीच्या भजनी मंडळास झेडपीतर्फे साहित्यांचे वितरण

राजकुमार थोरात
सोमवार, 2 जुलै 2018

वालचंदनगर (पुणे) : लासुर्णे (ता.इंदापूर) जवळील माेहितेवाडी येथील  हनुमान भजनी मंडळास पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते साहित्य भेट देण्यात आले.

वालचंदनगर (पुणे) : लासुर्णे (ता.इंदापूर) जवळील माेहितेवाडी येथील  हनुमान भजनी मंडळास पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते साहित्य भेट देण्यात आले.

महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. पुणे जिल्हातील सर्व गावामध्ये भजनी मंडळ आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने भजनी मंडळाला भजन, किर्तनासाठी साहित्य देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आज सोमवार(ता.२) रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते लासुर्णे जवळील मोहितेवाडी येथील  हनुमान भजनी मंडळास पकवाज, वीणा,टाळ - मृंदुग, पेटी चे वितरण करण्यात आले. यावेळी  लासुर्णेचे माजी उपसरंच महादेव मोहिते, संजय निंबाळकर, माऊली मोहिते,दत्तात्रेय कदम, विशाल घोगरे, रामभाऊ जामदार उपस्थित होते.  

Web Title: distribution of material of bhajan to mohitewadi bhajani mandal