पुणे : कॅन्टोन्मेंटमधील 10 हजार नागरिकांना होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक औषध म्हणून Arsenicum Album 30 हे होमिओपॅथीक औषध सुचविले आहे. हेच औषध आमदार सुनील कांबळे यांनी कॅन्टोन्मेंट मतदार संघात सुमारे 10 ते 11 हजार लोकांना वाटप केले आहे.

कॅन्टोन्मेंट : कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढविणे हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. याकरिता भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक औषध म्हणून Arsenicum Album 30 हे होमिओपॅथीक औषध सुचविले आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, हेच औषध आमदार सुनील कांबळे यांनी कॅन्टोन्मेंट मतदार संघात सुमारे 10 ते 11 हजार लोकांना वाटप केले आहे. यामध्ये कॅम्प, वानवडी, घोरपडी, ताडीवाला रोड,  डायस्प्लॉट आदी  भागात हे वाटप झाले असून उर्वरित भागात वाटपसुरूच आहे.

यामध्ये रोज सकाळी उपाशीपोटी चार गोळ्या सलग 3 दिवस घेणे. (बॉटलच्या झाकणातच 4 गोळ्या टाकणे व जीभेवर टाकून चघळणे.), हाच डोस पुन्हा बर एक महिन्यांनी परत घेणे म्हणजे रोज सकाळी उपाशीपोटी चार  गोळ्या सलग 3 दिवस घेणे. तसेच 3 वर्षापर्यंत मुलाला 2 गोळ्या देणे. अशा प्रकारे औषधांचे सेवन करायचे आहे. 

- मोठी बातमी : 'या' भागातील शाळा सुरु होणार? ऑनलाइन अॅडमिशनला सुरुवात!

त्याचबरोबर औषध सकाळी उपाशी पोटीच घेतल्यानंतर कमीत कमी अर्धा तास काहीही खाऊ नये अथवा पाणी पिऊ नये. औषधे ज्या दिवशी घेत आहात त्या दिवशी कच्चा कांदा, कच्चा लसूण खाऊ नये व कॉफी घेऊ नये मात्र भाजीत कांदा, लसूण असेल तरी चालेल. असे सुनील कांबळे यांनी पत्रकाच्या माध्यमातून जनजागृती सुरु केली आहे.

- आता महिलाही मशिदीत नमाज अदा करणार? सुप्रीम कोर्टाने केंद्रासह वक्फबोर्डाला पाठवली नोटीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of medicines to 10 thousand citizens in the cantonment constituency