esakal | पुणे : बदलीची चर्चा आणि रूबल अग्रवाल भल्या पहाटेच उतरल्या रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

rubal.jpg

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावर बदली झाल्याची चर्चा रंगली असतानाच पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल मात्र शुक्रवारी भल्या सकाळीच रस्त्यावर उतरल्याचे दिसले. तेही चक्क महापालिकेच्या सफाई कामगारांना "पीपीई कीट' देण्याकरिता.

पुणे : बदलीची चर्चा आणि रूबल अग्रवाल भल्या पहाटेच उतरल्या रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावर बदली झाल्याची चर्चा रंगली असतानाच पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल मात्र शुक्रवारी भल्या सकाळीच रस्त्यावर उतरल्याचे दिसले. तेही चक्क महापालिकेच्या सफाई कामगारांना "पीपीई कीट' देण्याकरिता.

शिरूर शहरावर कोरोनाच्या धोक्याची टांगती तलवार

दरम्यान, हा कार्यक्रम आटोपून अग्रवाल महापालिकेत पोचल्या, त्यानंतरच्या काही मिनिटांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत "कंटेन्मेंट झोन'ची पाहणी आणि बैठकीलाही अग्रवाल यांनी हजेरी लावली. परिणामी, या साऱ्या गडबडीत बदलीची शक्‍यता अग्रवाल यांनीच फेटाळून लावली. तरीही, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरांच्या बदलीच्या शक्‍यतेने अग्रवाल यांचे नाव पुढे येत आहे. 

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू होऊन अग्रवाल यांना आता पुढच्या महिन्यांत दोन वर्षे पूर्ण होतील. सध्या त्यांच्या महापालिकेतील विविध प्रमुख खात्यांची जबाबदारी आहे. तसेच पुणे स्मार्टसिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशनच्या (पीएसडीसीएल) मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. त्याचवेळी कोरोनाविरोधातील मोहिमेतही त्यांचा पुढाकार असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपायांसह रुग्णांसाठी नव्या सुविधा उभारणे, रुग्ण, संशयित घराबाहेर पडणार नाहीत, यासाठीचा बंदोबस्त करणे या प्रमुख कामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

बारामतीत हाॅटेलला परवानगी न मिळाल्यास

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर बदलीची चर्चा रंगली असून, त्यानुसार नवनवे निष्कर्षही काढले जात आहेत. त्याचवेळी पिंपरी-चिंवचड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या बदलीची दाट शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर अग्रवाल यांच्या कामांचा धडाका पाहून त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कार्यभार सोपविला जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, अद्याप तशी चर्चा नाही आणि कोणता निर्णयही झाला नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

स्वच्छतेची कामे करणाऱ्या महापालिकेच्या पाच कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या कामगारांकडे हॅण्डग्लोज, मास्क वगळता अन्य साधने नसल्याचे पाच जणांच्या मृत्यूनंतर उघडकीस आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेचे साहित्य पुरविण्यात आले आहे. त्यासाठी सारसबाग परिसरात झालेल्या कार्यक्रमाला अग्रवाल उपस्थितीत होत्या.

सफाई कामगारांकडील सुरक्षिततेच्या साधनांची पाहणी करीत, काय हवे? अशी विचारपूस करीत अग्रवाल यांनी काळजी घेण्याचे आवाहन कामगारांना केले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये,यासाठी झटणाऱ्या स्वच्छतागृहांमधील कामगारांना काही साहित्य पुरविण्याची अपेक्षा अग्रवाल यांनी मांडली. 

मुंबईहून जुन्नरमध्ये येताय तर...

loading image
go to top