गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

चिंतामणी क्षीरसागर
शुक्रवार, 20 जुलै 2018

वडगाव निंबाळकर (पुणे) : कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथील भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले. बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्या वाढदिवसानिमित्त हे वाटप करण्यात आले.

गावच्या विकासात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भुमिका महत्वाची असते. काळे यांच्या कामाविषयी येथील ग्रामस्थांना आदर वाटतो. यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्याची भूमिका ग्रामपंचायत सदस्य सुरज खोमणे यांनी मांडली. याला चांगला प्रतिसाद मिळाला नवनाथ हाके, अभिजीत खुडे यांनी शैक्षणिक साहित्य, प्रविण गावडे यांनी खाऊ, मकरंद माने यांनी गणवेश गरजु विद्यार्थ्यांना दिले.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लालासो माळशिकारे यांची निवड झाल्याबद्दल नागरीकांनी सत्कार केला. यावेळी माजी सरपंच धनंजय खोमणे, बाळासाहेब खोमणे, राहुल खोमणे, बन्सी गावडे, माऊली खुडे, वैभव भोसले, संग्राम खोमणे, अभिजीत शेवाळे, विराज खोमणे उपस्थित होते.

Web Title: distribution of school material to students