पुणे : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; बसने घरी सोडणार तेही मोफत!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 9158278484, 8484086061 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

पुणे : लाॅकडाऊनमध्ये पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अखेर घरी जाण्यासाठी थेट जिल्हा प्रशासनानेच मदत करण्याचा निर्णय घेतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत खासगी बसने त्यांच्या जिल्ह्यात सोडले जाणार आहे. यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स संघटनेचे सहकार्य घेतले जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या ५४ दिवसांपासून पुण्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी एकट्याने खोलीत रहात आहेत. त्यांना गावाकडे जायची परवानगी मिळावी, सरकारने बसची सुविधा करावी अशी मागणी विद्यार्थी करत होते. सरकार 'कोटा', 'दिल्ली'तील विद्यार्थी महाराष्ट्रात आणत आहे, पण पुण्यातील मुलांसाठी काहीच होत नाही यावर संताप व्यक्त करत होते. या विद्यार्थ्यांना मदत म्हणून काही विद्यार्थी संघटना व राजकीय पक्षांनी मोफत बस उपलब्ध करून दिली. पण सरकारने काहीच निर्णय घेतला नाही.

- 'लॉकडाउन'चा मुक्काम अखेर वाढला; पुण्यात काय चालू काय बदं?

आता ३१ मेपर्यंत लाॅकडाऊन असणार आहे, त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले होते. जिल्हा प्रशासनाकडून हे विद्यार्थी घरी पाठविले जावेत यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे, किरण निंभोरे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता.  विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नैसर्गिक आपत्ती निधीतून या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

- 'फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या'; पुण्यातील आयटी कंपनीचा प्रताप!

याबाबत उपजिल्हाधिकारी मीता शिंदे म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यासाठी बसची व्यवस्था करावी असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. यासाठी नैसर्गिक आपत्तीचा निधी वापरला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने गुगल फाॅम मध्ये माहिती भरून घेतली होती. त्यातील विद्यार्थ्यांशी संपर्क करून त्यांना गावाकडे पाठविले जात आहे. आज सोलपूर व यवतमाळसाठी प्रत्येकी एक बस सोडली आहे." 

- पुणे : आकडा वाढतोय; जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४ हजारांवर!

महेश बडे म्हणाले, "विद्यार्थ्यांना घरी जाता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यासाठी बसची सोय केली जाईल. यासाठी जिल्हा प्रशासनास मदत करणार आहोत." अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 9158278484, 8484086061 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिबंधीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलासा नाही
पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनामुळे घरी जाता येणार आहे. पण पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही. जे विद्यार्थी प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर राहत आहेत, त्यांनाच गावाकडे जाता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District administration takes decision about Free bus service for students who stranded in Pune