
कंपनीकडून सुमारे 800 कर्मचार्यांना कामावरून काढण्या संदर्भात नोटीस पाठविण्यात आली होती. याच बरोबर पुढील तीन महिण्याचे वेतन देणे बंधणकारक असताना ते त्यांना देण्यात आलेले नाही.
पुणे : चांगल्या पगाराची नोकरी मिळते म्हणून आयटीमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र कोरोनामुळे आयटीमधील कामगार हैराण झाले असून अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. तीन महिने फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या, अशी नोटीस पुण्यातील एका आयटी कंपनीने त्यांच्या 800 कर्मचाऱ्यांना पाठवली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
संबंधित कंपनीकडून कर्मचार्यांना पहिल्यांदा पगारी रजा घेण्यात सांगितले. पुढील रजा विना वेतन ग्राह्य धरली जाईल, असे सांगण्यात आले होते. या कर्मचार्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले होती. एक तर राजीनामा द्या किंवा पुढील तीन महिने विना वेतन काम करा असे सांगितले होते.
- आणखी वाचा - बारामतीकरांचे सोने खरेदीचे आकडे वाचून थक्क व्हाल
या विरोधात नॅशनल इन्फॉरमेशन टॅक्नोलॉजी एम्प्लाइज सिनेटच्यावतीने कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत कंपनीला कामगार आयुक्तांनी दणका दिला असून कुठल्याही कर्मचार्याला कामावरून काढू नये तसेच त्यांच्या वेतनात कपात करून नये अशा आदेश दिला आहे. कंपनीकडून सुमारे 800 कर्मचार्यांना कामावरून काढण्या संदर्भात नोटीस पाठविण्यात आली होती. याच बरोबर पुढील तीन महिण्याचे वेतन देणे बंधणकारक असताना ते त्यांना देण्यात आलेले नाही.
- कामावर परत या; कर्मचारी अन् अधिकाऱ्यांना पुणे विद्यापीठाचे आदेश!
या संदर्भात नॅशनल इन्फॉरमेशन टॅक्नोलॉजी एम्प्लाइज सिनेटच्या वतीने कामगार उपायुक्तांना निवेदन देण्यात आले होते. कंपनीला सरकारी कामगार अधिकारी एस. एच. चौभे यांनी पत्र पाठविले असून कोणत्याही कर्मचार्यांना कामावरून कमी करू नये, तसेच त्यांच्या वेतनात कपात करून नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद केले असल्याची माहिती सिनेटचे सरचिटणीस हरप्रित सलुजा यांनी दिली.
- आणखी वाचा - पुण्यात सरकारी कार्यालये सुरू होण्याचे संकेत
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा