जिल्हा बॅंकेची अकोले शाखा शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महत्वपुर्ण भुमिका : आमदार भरणे 

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 1 जुलै 2018

भिगवण : राज्यामध्ये विरोधी पक्ष्याचे सरकार असतानाही विकासाची विक्रमी कामे केली आहेत सत्ताधारी आमदार असतो तर तालुक्यामध्ये आणखी वेगळे चित्र दिसले असते. तालुक्यातील जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणुन अकोले येथे जिल्हा बॅंकेच्या शाखेची सुरुवात करत आहोत. पुणे जिल्हा बॅंकेची ही शाखा शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्वपुर्ण भुमिका निभावेल असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. 

अकोले(इंदापुर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेचे उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालिका सुमनताई दराडे, पांडुरंग दराडे, नानासाहेब दराडे, विष्णुपंत देवकाते, बँकेचे अधिकारी विजय टापरे, सरपंच गीता दराडे, उपसरपंच युवराज कोकरे उपस्थित होते. आमदार भरणे पुढे म्हणाले, अकोले गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे त्यामुळे या भागातील दळणवळण सुकर झाले आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची नाळ ही जिल्हा बॅंकेशी जोडली गेली आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. यापुर्वी अकोले परिसरासरामधील शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहारासाठी कळस किंवा भिगवण येथे जावे लागत असे अकोले शाखेमुळे या भागातील शेतकऱ्यांची सोय होणार आहे. कर्जमाफीमधील गोंधळामुळे सध्या शेतकरी अडचणीत आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य व मदत करण्याची भुमिका आहे. प्रास्ताविक पांडुरंग दराडे यांनी केले सुत्रसंचालन गणेश देवकर यांनी केले तर आभार कैलास वणवे यांनी मानले.

Web Title: District bank's Akole branch will play an important role in the growth of farmers: