पुण्याचे जिल्हाधिकारी थेट उतरले शेतात

जयदीप हिरवे
Saturday, 19 September 2020

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात गेली काही दिवस मुसळधार पाऊस पडत असून, याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. प्रामुख्याने या भागातील मुख्य पीक असलेल्या बटाटा पिकाची काढणी हंगाम सुरू झालेला असतानाच चालू असलेल्या अतिपावसामुळे बटाटे सडू लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या नुकसानीची पाहणी आज जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी थेट शेतामध्ये जावून केली. 

सातगाव पठार (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात गेली काही दिवस मुसळधार पाऊस पडत असून, याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. प्रामुख्याने या भागातील मुख्य पीक असलेल्या बटाटा पिकाची काढणी हंगाम सुरू झालेला असतानाच चालू असलेल्या अतिपावसामुळे बटाटे सडू लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या नुकसानीची पाहणी आज जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी थेट शेतामध्ये जावून केली. 
      

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

सातगाव पठार भागात चालू असलेल्या अतिपावसाचा फटका बटाटा पिकाला बसला असून, शेताच्या बांधावर आरण लावून ठेवलेले बटाटे सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खूपच मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. या पिकाची पाहणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या समवेत पारगावतर्फे खेड (ता. आंबेगाव) येथील शेतकरी मल्हारी नथू पवार या शेतकऱ्याच्या शेतात जावून केली. या वेळी त्यांनी बटाटा साठवणीसाठी शेतकऱ्यांच्या गटास किंवा वैयक्तीक शेतकऱ्यास गोडावून व शेड उभारण्यासाठी शासकीय योजनेमार्फत अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगीतले.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रसंगी खेडचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, कृषी अधिकारी मनोज कोल्हे, कृषी सहायक पी. बी. ढेंगळे, वैशाली मिडगुले, एम. टी. कराळे, शेतकरी राम तोडकर, भाऊसाहेब सावंत, सुधाकर पवळे, वसंत एरंडे, गणेश भागडे, रमेश सावंत, बाळासाहेब मनकर आदी शेतकरी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector inspected the damage to potato cultivation in Satgaon pathar