esakal | पुण्यातील 12 ताडी दुकानदारांचे परवाने रद्द व फौजदारी दाखल करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh-Deshmukh

ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केलेल्या 12 ताडी दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी अपात्र करण्यासह त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवून फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

पुण्यातील 12 ताडी दुकानदारांचे परवाने रद्द व फौजदारी दाखल करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केलेल्या 12 ताडी दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी अपात्र करण्यासह त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवून फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे जिल्ह्यात 16 दुकानांना परवाने देण्यात आले होते. या दुकानांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी तपासणी मोहिमी राबवली. ताडीचे नमुने  मुंबईच्या हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. 

पुण्यात भांडणे सोडविल्याच्या रागातून टोळक्‍याकडून तरुणावर कोयत्याने वार

या संस्थेने दिलेल्या अहवालात 12 दुकानातील ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केल्याचे सिध्द झाले. भेसळयुक्त ताडी सेवनाने मानवी प्रकृतीवर घातक परिणाम होत असल्याची बाब स्पष्ट झाले. त्या नंतर जिल्हाधिका-यांनी परवाने रद्द करुन फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. 

या पुढील काळातही चुकीच्या पध्दतीने ताडीविक्री करणा-यांविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. 

बारामती-फलटण रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रीया रखडली

ज्या दुकानदारांचे परवाने रद्द केले आहेत, त्यांची यादी खालील प्रमाणे-  

 • अशोक साहेबराव भंडारी, कळंब वालचंदनगर, 
 • चंद्रकांत हनुमंत शिंदे, अंथुर्णे क्र. 1, ता. इंदापूर 
 • वसवराज वालाप्पा भंडारी, थेरगाव, ता. मुळशी 
 • सुरेश भिमराव भंडारी, केडगाव बोरीपाथी, ता. दौंड, 
 • लक्ष्मीनारायण फकिरय्या गौड, भिगवण, ता. इंदापूर 
 • अविनाश प्रल्हाद भंडारी, निरा, ता. पुरंदर, 
 • विजय गोपीनाथ भंडारी, सणसर, ता. इंदापूर 
 • निलम साया गौड, लोणावळा 
 • अमृत माणिक भंडारी, शिंगवे पारगाव, ता. आंबेगाव 
 • व्यकटेंश दस्तय्या कलाल, बावधन, ता. मुळशी 
 • चंद्रकांत हनुमंत शिंदे, इंदापूर 
 • राजशेखर अनंतराम गौड, जक्शन ता. इंदापूर 

Edited By - Prashant Patil