
पुणे : गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेसाठी वकील न मिळालेल्या 500 हून अधिक पक्षकारांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने न्यायिक मदत केली आहे. त्यामुळे लॉकडाउन काळात बचाव पक्षाला वकील शोधण्यासाठी करावी लागणारी कसरत काहीशी कमी झाली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भाव फटका न्यायालयीन कामकाजावर देखील झाला आहे. सध्या न्यायालयात फक्त महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या वकिलांची संख्या घटल्याने आरोपींना मात्र वकील मिळण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. न्यायालयात हजर करण्यात येणाऱ्या आरोपींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मदतीचा हात देण्यात येत आहे. वकील मिळत नसल्याने प्राधिकरणातर्फे आरोपींना मोफत वकील देण्यात येत आहे.
न्यायालयाच्या नियमानुसार आरोपींना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील द्यावा लागतो. मात्र लॉकडाउनमुळे आरोपींना वकील मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे आरोपींना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील मिळत नसल्याने त्यांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील देण्यात यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार आरोपींना मोफत वकील सुविधा देण्यात येते आहे.
प्राधिकरणातर्फे गरजू लोकांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना मोफत कायदा सेवा देण्यात येते. प्राधिकरणातर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात वकील मिळत नसलेल्या सुमारे पाचशे जणांना मोफत वकील देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.