जिल्हास्तरावर होणार रुग्णालय व्यवस्था कक्ष; कोरोना रुग्णांना मिळणार चोवीस तास सेवा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकही रूग्ण केवळ बेडअभावी (खाटा) उपचारापासून वंचित  राहू नये, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तरावर रुग्णालय व्यवस्था सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी रुग्णालय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय यासाठी जिल्हा परिषदेशी करार केलेल्या सर्व खासगी रुग्णालयांमध्ये चोवीस तास प्रत्येकी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकही रूग्ण केवळ बेडअभावी (खाटा) उपचारापासून वंचित राहू नये, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तरावर रुग्णालय व्यवस्था सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी रुग्णालय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय यासाठी जिल्हा परिषदेशी करार केलेल्या सर्व खासगी रुग्णालयांमध्ये चोवीस तास प्रत्येकी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांच्याकडे या कक्षाच्या समन्वययाची जबाबदारी देण्यात आली आहे. या कक्षांमार्फत कोरोना रुग्णांना जिल्हा परिषदेमार्फत प्राधिकृत करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध करून देणे, बेड उपलब्ध नसल्यास, तो कधी उपलब्ध होईल, याबाबत मार्गदर्शन करणे, उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णावर  वेळेत उपचार होण्यासाठी प्रयत्न करणे आणि रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर संबंधित रुग्णाला मूळ गावी परत सोडणे आदींसाठी मदत केली जाणार आहे. 

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक होणार ढोल-ताशाविना

जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी कोवीड केअर सेंटर्स, आयसोलेशन सेंटर्स, क्वरांटांइन सेंटर्स आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोवीड हॉस्पिटल कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. शिवाय पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सरकारी रुग्णालयांबरोबरच काही खासगी रुग्णालये प्राधिकृत करण्यात आलेले आहेत.

वर्क फ्रॉम होममुळे वाढले मूळव्याधीचे प्रमाण; पुण्यातील सर्वेक्षणातून समोर आली माहिती

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरापाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अगदी सुरुवातीच्या दोन महिन्यांपर्यंत केवळ एकूण ४९ कोरोना रूग्ण असलेला आकडा आता साडेसोळा हजारांवर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे अकरा हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित साडेपाच हजार रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. केवळ बेडअभावी एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून हा जिल्हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
- निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, पुणे.

जिल्हा कक्षाचा संपर्क क्रमांक
जिल्हा परिषदेच्यावतीने प्राधिकृत करण्यात आलेल्या शहरातील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध आहे का, असल्यास कोठे आणि बेड मिळविण्यासाठीचे निकष आदींची माहिती या कक्षाकडे मिळू शकणार आहे. इच्छुकांना (०२०)२६१३८०८२ किंवा २६१३८०८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: district level hospital management room Corona patients will get round the clock service