Pune मंचरला आवटे महाविद्यालयाच्या मैदानात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

पुणे जिल्ह्यातील 87 संघ सहभागी

Pune : मंचरला आवटे महाविद्यालयाच्या मैदानात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा सुरु

मंचर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात पुणे विद्यापीठ व जिल्हा क्रीडा विभाग अंतर्गत मुलांच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ झाला आहे. पुणे जिल्ह्यातील ८७ महाविद्यालयातील संघ सहभागी झाले आहेत. अत्यंत अटीतटीच्या स्पर्धा सुरु आहेत.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ.सुहास बहिरट व मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी बाळासाहेब बाणखेले, उदय पाटील, प्रा. रावसाहेब गरड, डॉ. रमेश गायकवाड , सहसचिव डॉ. आशिष तळेकर व स्पर्धक उपस्थित होते.

“शासकीय सेवेमध्ये खेळाचे महत्व अधिक आहे. त्यासाठी पाच टक्के आरक्षण आहे. आरक्षणाचा फायदा खेळाडूंनी घेतला पाहिजे.” असे बेंडे पाटील यांनी सांगितले. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी कानडे यांनी स्वागत करून स्पर्धेचे नियम व अटी विशद केल्या. ते म्हणाले “

आवटे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. सुनील पानसरे , प्रा. टी जी साळुंखे व प्रा.सागर काळे यांनी स्पर्धेची उत्तम व्यवस्था केली आहे.स्पर्धकांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दूरवरून येणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था केली आहे. खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धां पार पडतील. प्रा.श्रद्धा महाकाळ यांनी आभार मानले.