
Pune traffic
ESakal
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून कात्रजकडून किवळेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान तसेच किवळे ते कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड, अवजड वाहनांना पुढील आदेश येईपर्यंत बंदी करण्यात असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.