औंधकडुन सांगवी भुयारी मार्गावर अखेर विभाजक टाकण्याचे काम सुरू

रमेश मोरे
बुधवार, 23 मे 2018

सांगवी फाटा येथील महात्मा फुले उड्डाणपुलावरील औंध कडुन येणा-या व औंध डिपी रोड महादजी शिंदे पुलावरून येणा-या वहानांसाठी आता विभाजक केल्याने अपघाताचे धोके टळणार आहेत.

जुनी सांगवी - सांगवी फाटा येथील महात्मा फुले उड्डाणपुलावरील औंध कडुन येणा-या व औंध डिपी रोड महादजी शिंदे पुलावरून येणा-या वहानांसाठी आता विभाजक केल्याने अपघाताचे धोके टळणार आहेत.

महात्मा फुले उड्डाण पुलावरील औंध कडुन येण्यासाठी तयार केलेला उड्डाणपुल रस्ता व वाकड चिंचवड कडे जाण्यासाठी तयार करण्यात आलेला रस्ता सांगवी भुयारी मार्गापर्यंत पुर्वी एकत्रच असल्याने औंध व डी.पी.रोड कडुन सांगवीकडे जाणा-या वहानचालकांना पुलावरून वेगात येणा-या वाहनांवर लक्ष ठेवुन सांगवी भुयारी मार्गाकडे जाण्यासाठी मार्गक्रमण करावे लागत होते. 

पुलावरून येणारी वाहने वाकड चिंचवड कडे जाणारी वहाने एकत्र येत असल्याने वाहनचालकांची तारांबळ होवुन कोंडी व्हायची. औंधकडुन सांगवीकडे येण्यासाठी स्वतंत्र भुयारी मार्ग आहे. केवळ विभाजक नसल्याने औंध कडुन सांगवी व चिंचवड, वाकडकडे जाणारी वाहने भुयारी मार्गाजवळ एकत्र येत असल्याने येथे अपघाताचा धोका होता. वाहनचालकांच्या अडचणी सातत्याने सकाळमधुन मांडल्या जात होत्या. याची दखल घेत पालिकाप्रशासन रस्ते वाहतुक विभागाकडुन या मार्गावर रस्ता विभाजक टाकण्यात आल्याने वाहानचालकांकडुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या विभाजकामुळे एकाच रस्त्यावर एकत्र येणारी वहाने विलग झाल्याने अपघाताचा धोका टळणार आहे.

Web Title: divider work started on Sangvi subway road